News Flash

‘गरज असताना साऱ्यांनीच पाठ फिरवली’

बॉबीने त्याच्या भावनांना वाट मोकळी केल्याचं पाहायला मिळालं आहे.

बॉबी देओल

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल सध्या त्याच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे लवकरच बॉबी ‘यमला पगला दिवाना फिरसे’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने झालेल्या एका मुलाखतीमध्ये बॉबीने त्याच्या भावनांना वाट मोकळी केल्याचं पाहायला मिळालं आहे.

‘रेस ३’ चित्रपटाच्या यशानंतर बॉबीकडे अनेक चित्रपट दिग्दर्शकांनी त्यांच्या आगामी चित्रपटांसाठी विचारणा केली. त्यामुळे सध्या बॉबीकडे चित्रपटांची रांग लागली आहे, असं म्हणायला हरकत नाही. मात्र एक काळ असा होता.जेव्हा बॉबीकडे एकही चित्रपट नव्हता.त्यामुळे अशा काळात त्याने अनेक दिग्दर्शक, निर्माते यांची भेट घेतली होती. मात्र पदरात निराशाच पडत होती. याविषयी बॉबीने त्याचं मत मांडलंय.

‘बॉलिवूडमध्ये ‘रेस ३’ मधून पुन्हा पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यामुळे पुन्हा एकदा माझ्याभोवती चाहत्यांची वर्दळ सुरु झाली. आज अनेक निर्माते, दिग्दर्शक मला त्यांच्या चित्रपटात घेऊ इच्छितात. मात्र जेव्हा मला गरज होती. तेव्हा कोणीच मदतीला आलं नव्हतं. मात्र आता माझ्याकडे माझी हक्काची माणसं आहेत’,असं बॉबी म्हणाला.

पुढे तो असंही म्हणाला, ‘आता माझ्याकडे खूप काम आहे आणि हे काम असंच टिकून राहण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. यासाठी वाट्टेल तेवढे कष्टही मी उपसू शकतो. विशेष म्हणजे आता माझ्या कामाचा व्याप वाढला आहे. त्यामुळे आता माझी मदत करण्यासाठी माझी एक स्वतंत्र टीमही आहे’.

दरम्यान, बॉबी लवकरच ‘यमला पगला दिवाना फिरसे’ या चित्रपटामध्ये झळकणार असून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर त्याच्या आगामी ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटाचंही चित्रीकरणही सुरु होणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 2:42 pm

Web Title: nobody helped me before race 3 bobby deol
Next Stories
1 ‘काकस्पर्श’नंतर महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, गिरीश जोशी पुन्हा एकत्र
2 Kerala Floods : ‘फक्त आर्थिकच नव्हे तर इतर मार्गांनीही केरळला मदत करा’
3 शाहरुखच्या मुलासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार खुशी कपूर
Just Now!
X