02 March 2021

News Flash

मला बॉलिवूडमध्ये कोण कामच देत नाही, मिलिंद सोमणची खंत

आपल्याला बॉलिवूडमध्ये कोणीही काम देत नाही अशी खंत मिलिंदनं बोलून दाखवली आहे.

मिलिंद सोमण

‘फिटनेस फ्रिक’ आणि सुपर मॉडेल मिलिंद सोमण सोशल मीडियावर तरुणांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या १२ व्या पर्वासाठीही त्याच्या नावाची चर्चा होती. त्याची सोशल मीडियावर चलती असली तरी बॉलिवूडपासून मिलिंद चार हात लांबच आहे. ‘बाजीराव मस्तानी’, ‘शेफ’ नंतर क्वचितच एखाद्या चित्रपटात मिलिंद दिसला. याचं कारणही नुकतंच त्यानं एका मुलाखतीत सांगितलं आहे. आपल्याला बॉलिवूडमध्ये कोणीही काम देत नाही अशी खंत मिलिंदनं बोलून दाखवली आहे.

‘बॉलिवूडमध्ये माझे फारसे मित्र- मैत्रीण नाहीत. मी अभिनय क्षेत्राशीदेखील जोडलो आहे हे फार कमी लोकांना ठावूक आहे. या इण्डस्ट्रीत काम मिळवायचं असेल तर तुमच्या ओळखी लागतात आणि मी फारसा कुणाच्याही संपर्कात नसतो. त्यामुळे कदाचित माझ्याकडे काम येत नसेल. कधीतरी चुकून मला बॉलिवूडमधील चित्रपटात भूमिका मिळतात. मी जे मिळेल ते काम करतो. भूमिका किती मोठी आणि लहान आहे हे महत्त्वाचं नाही. तुम्ही ती किती चांगल्या प्रकारे करतात हे महत्त्वाचं आहे’ असं मिलिंद आएएनएसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

‘आर्यनमॅन’ म्हणून ओळखला जाणारा मिलिंद नेहमीच फिटनेसचा प्रचार करतो, ‘मेड इन इंडिया’ गाण्यापासून तरूणींच्या हृदयावर राज्य करणारा मिलिंद बॉलिवूडमध्ये नव्या जोमानं काम करण्यासाठी उत्सुक आहे मात्र कोणीही आपल्याला संधी देत नाही याची खंत त्यानं बोलून दाखवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 10:27 am

Web Title: nobody wants to cast me in films said milind soman
Next Stories
1 राज्य शासनानेच आर. के. स्टुडिओ विकत घेऊन संग्रहालय उभारावे- माणिकराव ठाकरे
2 ‘ललित २०५’ मध्ये पाहायला मिळणार मंगळागौरीचा खेळ
3 Kasautii Zindagii Kay 2: टीममधल्या ‘या’ कलाकाराला मिळालं सर्वाधिक मानधन
Just Now!
X