2021 सालालीत ९३वा अकॅडमी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात ‘नोमडलँड’ सिनेमाची वर्णी लागली आहे. तीन पुरस्कारांवर आपलं नाव कोरंत या सिनेमाने यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात बाजी मारली आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाला यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये बाजी मारल्यानंतर ‘नोमडलँड’ने ऑस्कर सोहळ्यातही चमक दाखवली. या सिनेमासाठी अभिनेत्री फ्रान्सिस मॅकडॉर्मंड हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. तर क्लोई जाओ यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ऑस्करच्या इतिहासात दिग्दर्शनासाठी पुरस्कार मिळालेल्या त्या दुसऱ्या महिला दिग्दर्शक ठरल्या आहेत. या आधी बाफ्टा पुरस्कार सोहळ्यातही ‘नोमडलँड’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.त्यासोबतच गोल्डन ग्लोब, डिजीए या पुरस्कारांमध्ये या सिनेमाला विविध श्रेणीत पुरस्कार प्रात्प झाले आहेत.

घराबाहेर पडून फिरायला निघालेल्या एका महिलेची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. फ्रान्सिस मॅकडॉर्मंड हिने या सिनेमात या महिलेची मुख्य भूमिका साकारली आहे. पतीच्या निधनानंतर एकटी पडलेली साठ वर्षीय फर्न एका व्हॅनमध्ये राहते. ती एका गोदामात काम करते. त्यानंतर मिळेल तिथे वाट सोधत तिचा प्रवास सुरू होतो. काही काळासाठी ती गावोगावी हिंडणाऱ्या भटक्या समाजातील टोळ्यांमध्ये सामील होते. मात्र पुन्हा एकदा ती एकटीच संपूर्ण देशात ती फिरते. फर्न ही क्लोई जाओ यांच्या सिनेमाचं मुख्य केंद्र आहे.

ऑस्कर सोहळ्याचे संपूर्ण अपडेटस् : ऑस्कर 2021 पुरस्कारांमध्ये ‘नोमडलँड’ची वर्णी

जेसिका ब्रुडर यांच्या एका पुस्तकावर आधारित या सिनेमाचं कथानक आहे. कधी एकटी, कधी काही लोकांसोबत तर कधी मिळेल ते काम करत परिस्थितीशी जुळवत समाधानाचं आयुष्य जगणाऱ्या फर्नची ही कथा अनेकांच्या पसंतीस उतरली आहे.