News Flash

माझ्या एकाही मुलाला माझ्यासारख्या सवयी नाहीत- शाहरुख

पिता आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका निभावणा-या बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानला आपल्या मुलांनी त्यांची इच्छा असेल ते करावे असे वाटते.

| June 17, 2014 05:33 am

पिता आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका निभावणा-या बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानला आपल्या मुलांनी त्यांची इच्छा असेल ते करावे असे वाटते. मात्र, यासाठी त्यांनी त्यांच्या आरोग्य आणि आनंदाशी कोणतीही तडजोड करू नये असेही शाहरुखचे म्हणणे आहे. तो आपल्या मुलांना चांगली मुले (गुड किड्स) असे म्हणतो आणि ती आपल्यापेक्षाही चागंले ह्युमन बिइंग आहेत याचा त्याला आनंद आहे.
शाहरुख आणि गौरीला तीन मुले आहेत. आर्यन (१७), सुहाना (१४) आणि अब्राम (१). “मला माझ्या मुलांना आनंदी आणि निरोगी पाहायला आवडते. त्यांची इच्छा असेल ते त्यांनी करावे. मी मुलांना कधीच त्यांनी अभिनेता किंवा इंजिनिअर बना असे नाही सांगत,” असे ४८ वर्षीय शाहरुख फादर्स डेच्या दिवशी किडझानिया येथे झालेल्या कार्यक्रमात म्हणाला. आपली मुले चांगली मुले म्हणून वाढत आहेत याचा शाहरुखला आनंद आहे. “माझ्या एकाही मुलाला माझ्यासारख्या सवयी नाहीत. यासाठी मी देवाचे आभार मानतो. ती खूप चांगली मुले आहेत. मी, सुहाना आणि अब्राममध्ये जी समान आहे ते म्हणजे गालावरील खळी”, असे शाहरुख म्हणाला.
शाहरुख लवकरच फराह खानच्या हॅपी न्यू इयर चित्रपटात दीपिका पादुकोणसोबत दिसणार आहे..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2014 5:33 am

Web Title: none of my children have my habits srk
टॅग : Entertainment News
Next Stories
1 कपूर हे पक्के खवय्ये – अरमान जैन
2 … अन् महानायक अवतरला मुंबई शेअर बाजारात!
3 प्रिती झिंटाच्या अर्जाबाबत पोलिसांचे अनेक प्रश्न
Just Now!
X