News Flash

नोरा आणि नताशा यांच्यात डान्सची स्पर्धा, जुना व्हिडीओ व्हायरल

पाहा व्हिडीओ...

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री नोरा फतेही चर्चेत आहे. आता तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नोरा आणि हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टेनकोविक डान्स करताना दिसत आहेत. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

डान्स स्वॅग या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नोरा आणि नाताशाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दोघीही ओ साकी साकी रे गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दरम्यान दोघींमध्ये स्पर्धा सुरु असल्याचे दिसत आहे.

नताशाने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर नोराने पिवळ्या रंगाचा टॉप आणि प्लाझो परिधान केली आहे. दोघीही अतिशय सुंदर दिसत आहेत. हा व्हिडीओ तिन लाखा पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. त्या दोघींचा हा जुना व्हिडीओ आता पुन्हा एकदा चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वीच नोरा आणि गुरु रंधावा यांचा ‘नाच मेरी रानी’ हा अल्बम प्रदर्शित झाला होता. या अल्बममध्ये नोराचा डान्स पाहण्यासारखा आहे. तसेच नोरा आणि गुरु रंधावा यांची केमिस्ट्री देखील पाहण्यासारखी आहे. हे गाणे सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. तसेच ती अजय देवगणच्या भुज: द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटात देखील भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जाते. तिची ‘दिलबर’, ‘कमरिया’, ‘साकी-साकी’ ही गाणी हिट ठरली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 5:36 pm

Web Title: nora fatehi and natasa stankovic dance competition on saki saki song avb 95
Next Stories
1 विरोधानंतर अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’चं नाव बदललं, आता असेल…
2 Big Boss 14: जॅस्मिनने राहुलच्या अंगावर फेकले पाणी, नेटकऱ्यांनी सुनावले
3 शाहरुखचा ‘पठाण’ पुढच्या दिवाळीला होणार रिलीज?
Just Now!
X