नोरा फतेही ही बॉलिवूडमधील एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. मादक फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी ती एका प्रोफेशनल शेफसोबत जेवण करण्याचं ट्रेनिंग घेत आहे. या ट्रेनिंग दरम्यान तिने केलेल्या पदार्थाला चक्क आग लागते. हा थक्क करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

आणखी वाचा- “पोलिओ गेला आता करोनाची बारी”; बिग बींच्या करोना योद्ध्यांना शुभेच्छा

नोरा सध्या दुबईमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दरम्यान तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती एका प्रोफेशनल शेफसोबत जेवण करण्याचं ट्रेनिंग घेत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे जेवण करण्याचा प्रयत्न सुरु असतानाच तिने केलेल्या पदार्थाला आग लागते. अन् त्या आगीमध्ये तिला जेवण करायला शिकवणारा शेफ आपली कलाबाजी दाखवतो. हा थक्क करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.