आपल्या डान्सच्या मूव्हजने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. काही दिवसांपूर्वी ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातील ‘दिलबर दिलबर’ या गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनमधील डान्समुळे नोरा ही खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली. आता याच गाण्याचे अरेबीक व्हर्जनवर नोराने डान्स केला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

नुकताच बॉलिवूड अँक्टर १२१३ या इन्स्टाग्राम पेजने नोराचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या मित्रांसोबत मस्ती करताना दिसत आहे. त्याचबरोबर ती ‘दिलबर दिलबर’ या गाण्याच्या अरेबिक व्हर्जनवर डान्स करताना दिसत आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी नोरा ‘ओ साकी साकी’ गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. हे गाणे जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाउस’ चित्रपटामधील आहे. ‘ओ साकी साकी’ या गाण्याच्या रिक्रिएट व्हर्जनमध्ये नोराच्या दिलखेचक अदा चाहत्यांच्या मनावर राज्य करत होत्या. दरम्यान नोरा या गाण्यामध्ये आगीशी खेळताना देखील दिसली होती. हे गाणे नेहा कक्कर आणि तुलसी कुमार यांनी गायले असून तनिष्क बागचीने रिक्रिएट केले.