News Flash

Video : नोरा फतेहीचा करीना कपूरच्या ‘फेविकॉल से’ गाण्यावर जबरदस्त डान्स

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या डान्ससाठी विशेष ओळखली जाते. तिच्या डान्स आणि स्टाइलचे लाखो चाहते आहेत. तिचे इन्स्टाग्रामवर जवळपास २१.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. नोरा बऱ्याच वेळा सोशल मीडियावर तिच्या डान्सचे व्हिडीओ शेअर करताना दिसते. आता नोराचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नोराच्या एका फॅन पेजने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नोराने अभिनेत्री करीना कपूरचे सुपरहिट गाणे ‘फेविकॉल से’वर जबरदस्त डान्स केला आहे. व्हिडीओमध्ये नोराचा डान्स पाहण्यासारखा असून तिच्यासोबत तुलसी कुमारदेखील डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये नोराने फ्लोरल प्रिंटचा ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi FC (@norafatehi_rocks)

काय?? साडी नेसून अदा शर्माची कार्टव्हील उडी; पाहा व्हिडीओ

काही दिवसांपूर्वी नोराचा ‘नाच मेरी रानी’ हा अल्बम प्रदर्शित झाला होता. या अल्बममध्ये ती गुरु रंधावासोबत दिसली होती. या अल्बमला आता पर्यंत २० कोटी पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच नोरा ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील नोराचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 11:04 am

Web Title: nora fatehi dance on kareena kapoor khan fevicol se song video viral avb 95
Next Stories
1 ..म्हणून ‘पतौडी पॅलेस’मध्ये ‘तांडव’च्या शूटिंगसाठी सैफने दिली परवानगी
2 रेशीमगाठ! अभिज्ञा-मेहुलच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल
3 काय?? साडी नेसून अदा शर्माची कार्टव्हील उडी; पाहा व्हिडीओ
Just Now!
X