News Flash

‘नाच मेरी रानी’ गाण्यावर नोराचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

आपल्या डान्सच्या मूव्हजने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. नोरा ही ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातील ‘दिलबर दिलबर’ या गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनमुळे प्रकाश झोतात आली. काही दिवसांपूर्वीच नोराचा गुरु रंधावासोबत एक नवा अल्ब लाँच झाला होता. या अल्बमधील नोराचा डान्स पाहण्यासारखा होता. नोरा कायम तिच्या डान्समुळे चर्चेत असते. आता नोराचा आणखी एक डान्स व्हिडीओ चर्चेत आहे.

नुकताच खुद्द नोराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नोरा तिचा नुकताच प्रदर्शित झालेला अल्बम ‘नाच मेरी रानी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. दरम्यान नोरान काळ्या रंगाचा टॉप आणि पँट परिधान केली आहे. सध्या सोशल मीडियावर नोराचा हा डान्स व्हिडीओ चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

Comment below ur favourite choreo #Naachmerirani @aadilkhann @gururandhawa @amorecoutureofficial

A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on

या व्हिडीओमध्ये नोरा कोरिओग्राफर आदिल खानसोबत डान्स करताना दिसत आहे. त्या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहे.

‘दिलबर दिलबर’ गाण्यापूर्वी नोरा ‘ओ साकी साकी’ गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. हे गाणे जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाउस’ चित्रपटामधील आहे. ‘ओ साकी साकी’ या गाण्याच्या रिक्रिएट व्हर्जनमध्ये नोराच्या दिलखेचक अदा चाहत्यांच्या मनावर राज्य करत होत्या. दरम्यान नोरा या गाण्यामध्ये आगीशी खेळताना देखील दिसली होती. हे गाणे नेहा कक्कर आणि तुलसी कुमार यांनी गायले असून तनिष्क बागचीने रिक्रिएट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 7:12 pm

Web Title: nora fatehi dance on nach meri rani song video viral on avb 95
Next Stories
1 सनी लिओनीने केलं मतदान; फोटो शेअर करत म्हणाली, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष…
2 कधीकाळी आयटम साँगसाठी लोकप्रिय होता ‘कालिन भय्या’, शोमध्ये केला खुलासा
3 वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीने केलं ग्लॅमरस फोटोशूट; झाली ट्रोलिंगची शिकार