आपल्या डान्सच्या मूव्हजने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. नोरा ही ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातील ‘दिलबर दिलबर’ या गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनमुळे प्रकाश झोतात आली. काही दिवसांपूर्वीच नोराचा गुरु रंधावासोबत एक नवा अल्ब ‘ नाच मेरी रानी’ लाँच झाला होता. या अल्बमधील नोराचा डान्स पाहण्यासारखा होता. आता हा अल्बम यूट्यूबवर सुपरहिट ठरला आहे.
‘नाच मेरी रानी’ हा अल्बम यूट्यूबवरील सर्वाधिक पाहिला गेलेला अल्बम ठरला आहे. या अल्बमला जवळपास २० कोटी व्ह्यूज असल्याचे पाहायला मिळते.
या अल्बममध्ये नोराचा डान्स पाहण्यासारखा आहे. तसेच नोरा आणि गुरु रंधावा यांची केमिस्ट्री देखील पाहण्यासारखी आहे. हे गाणे तानिष्क बाग्ची यांनी लिहिले आहे. तसेच हे गाणे गुरु रंधावा आणि निकिता गांधी यांनी गायले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 8, 2020 6:46 pm