News Flash

‘छोड देंगे’ नोराचा नवा अल्बम प्रदर्शित

सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आपल्या डान्सच्या मूव्हजने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातील ‘दिलबर दिलबर’ या गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनमधील डान्समुळे नोरा ही खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली. नुकताच नोराचा आणखी एक म्युजिक व्हिडीओ प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

‘छोड देंगे’ असं या गाण्याच नाव आहे. या गाण्यातील नोराच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ प्रदर्शित होताच २ लाखा पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या गाण्यात नोराने उत्तम डान्स केला आहे.

हे गाणं टी- सीरिजच्या अधिकृत युट्युब अकाऊंटवरून प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणं योगेश दुबे यांनी लिहिले आहे. तर हे गाणे परंपरा टंडनने गायल आहे. या गाण्याची कोरिओग्राफी रजित देव याने केली आहे. काही दिवसांपुर्वी या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हा तो टीझर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

काही दिवसांपूर्वीच नोराचा गुरु रंधावासोबत एक अल्बम ‘ नाच मेरी रानी’ लाँच झाला होता. या अल्बमधील नोराचा डान्स पाहण्यासारखा होता. हा अल्बम यूट्यूबवर सुपरहिट ठरला होता. ‘नाच मेरी रानी’ हा अल्बम यूट्यूबवरील सर्वाधिक पाहिला गेलेला अल्बम ठरला होता. या अल्बमला जवळपास २० कोटी व्ह्यूज होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 5:07 pm

Web Title: nora fatehi new music video released dcp 98 avb 95
Next Stories
1 जॉनी लिव्हरच्या मुलीचा डान्सपाहून नेटकऱ्यांनी केली इतर स्टारकिड्सशी तुलना
2 ‘ऋषी कपूर यांनी वाचवले होते प्राण’; पद्मिनी कोल्हापुरेंनी सांगितला अंगावर काटा आणणारा ‘तो’ प्रसंग
3 आमिर खानच्या घरी लगीनघाई, इरा खान करते तयारी
Just Now!
X