News Flash

नोराच्या ‘या’ बॅगची किंमत ऐकून व्हाल थक्क

जाणून घ्या किंमत...

आपल्या डान्सच्या मूव्हजने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. नोराचे लाखो चाहते आहेत. नोरा कधी तिच्या डान्समुळे तर कधी तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे चर्चेत असते. आता सोशल मीडियावर नोराचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. पण यावेळेस मात्र सगळ्यांचे लक्ष नोराच्या कपड्यांनी नाही तर तिच्या बॅगने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या बॅगची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

नोराचा हा व्हिडीओ बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. नोराचा व्हिडीओ मुंबई विमानतळावरील आहे. या व्हिडीओमध्ये नोराने प्रिंटेड पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, जीन्स परिधान केली असून त्यावर काळा आणि सोनेरी रंगाचा बेल्ट लावला आहे. नोराचा कॅज्युअल लूक सध्या चर्चेत आहे. या लूकवर तिने काळ्या रंगाची बॅग असून या बॅगने सर्वांचे लक्ष वेधले आहे. Louis Vuitton या ब्रॅंडची ती बॅग आहे. या बॅगची किंमत जवळपास ३ लाख रूपये आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान, ‘दिलबर दिलबर’ या गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनमधील डान्समुळे नोरा ही खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली होती. काही दिवसांपूर्वी नोराचा ‘छोड देंगे’ हा म्युजिक व्हिडीओ प्रदर्शित झाला होता. यातील नोराच्या लूक आणि डान्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. या गाण्याला १३ कोटी व्ह्यूज होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 3:32 pm

Web Title: nora fatehi s bags price is in lakhs dcp 98
Next Stories
1 ‘सायना’चं पहिलं पोस्टर रिलीज, परिणीती चोप्रा सायनाच्या भूमिकेत
2 सलमानचा ‘टायगर ३’ इथे होणार शूट
3 कार्तिकच्या ‘धमाका’ चित्रपटाचा भन्नाट टीझर पाहिलात का?
Just Now!
X