23 November 2020

News Flash

नोरा फतेहीने कपिल शर्मा शोमध्ये केला भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

तिचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

कॅनडाची अभिनेत्री नोरा फतेही - बिग बॉस सीजन ९

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. या शोमध्ये हजेरी लावणारे कलाकार आणि शोचा सूत्रसंचालक कपिल शर्मा यांच्यामधील संवाद, मजा मस्ती पाहायला प्रेक्षकांना आवडते. नुकताच शोमध्ये आपल्या डान्सच्या मूव्हजने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री नोरा फतेहीने हजेरी लावली. दरम्यान तिने नाच मेरी रानी गाण्यावर डान्सही केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नुकताच नोरा ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये नाच मेरी रानी या अल्बमच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. दरम्यान तिने सफेद रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती.

नोराचा कपिल शर्मामधील डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये ती ‘नाच मेरी रानी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ एका फॅन पेजने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आता पर्यंत ४८ हजार लोकांनी पाहिला आहे.

काही दिवसांपूर्वीच नोरा आणि गुरु रंधावा यांचा ‘नाच मेरी रानी’ हा अल्बम प्रदर्शित झाला होता. या अल्बममध्ये नोराचा डान्स पाहण्यासारखा आहे. तसेच नोरा आणि गुरु रंधावा यांची केमिस्ट्री देखील पाहण्यासारखी आहे. हे गाणे सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 5:19 pm

Web Title: nora fatehi shows dance moves on the kapil sharma avb 95
Next Stories
1 दिशाने धनुष्यबाण दाखवत दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा; फोटो होतोय व्हायरल…
2 “माफी माग अन्यथा मानहानिचा दावा ठोकेन”; लविनाच्या आरोपांना अमायराचं प्रत्युत्तर
3 “हिंमत असेल तर समोर येऊन शिव्या घाल”; गौहर खानचं पवित्राला आव्हान
Just Now!
X