28 February 2021

News Flash

Video : विदेशी चिमुकल्यांमध्ये बॉलिवूडची क्रेझ; लंडनच्या रस्त्यावर नोरासोबत धरला ताल

नोराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

‘दिलबर’ या रिक्रिएटेड गाण्याने युट्यूबवर धुमाकूळच घातला आणि या गाण्यामुळे नोरा फतेही प्रकाशझोतात आली. अप्रतिम बेली डान्ससाठी ओळखली जाणारी नोरा आता बॉलिवूडमध्ये आयटम साँगसोबतच अभिनयसुद्धा करू लागली आहे. नोराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती लंडनच्या रस्त्यावर चिमुकल्यांना बॉलिवूड डान्स शिकवताना दिसतेय.

नोराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘स्त्री’ या चित्रपटातील नोराचा आयटम साँग ‘कमरियाँ’वर ती लहान मुलांना डान्स शिकवतेय. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहिलं, ‘आतापर्यंतची सर्वांत क्यूट गोष्ट आहे. ‘स्ट्रीट डान्सर’च्या सेटवर ही सर्व लहान मुलं त्यांच्या कुटुंबीयांसोबत आले होते. त्यांना माझ्यासोबत फोटो काढायचा होता. त्यातल्या एका लहान मुलाला माझ्या ‘कमरियाँ’ या गाण्यावर डान्स करून दाखवायचं होतं. हीच संधी साधून मी त्या सर्व लहान मुलांना माझा डान्स शिकवला. या निरागस मुलांपेक्षा जास्त आनंद कोणीच देऊ शकत नाही.’

अप्रतिम बेली डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकणारी नोरा फतेही मोरक्कन- कॅनेडियन अभिनेत्री आहे. २०१४मध्ये तिनं ‘रोअर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘क्रेझी कुक्कड फॅमिली’ या चित्रपटातही ती झळकली. मात्र हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटले. त्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटांमधील आयटम साँग्समुळे ती प्रकाशझोतात आली. ‘टेम्पर’, ‘बाहुबली’, ‘किक २’ यांसारख्या चित्रपटांतील नोराचे आयटम साँग्स विशेष गाजले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 10:22 am

Web Title: nora fatehi teaches dances to kids on kamariya song watch video ssv 92
Next Stories
1 Video : जेव्हा भर कार्यक्रमात मीराने केली करण जोहरची बोलती बंद
2 ‘हंसना आसान है, हंसाना बहुत मुश्किल..’; जगदीप यांच्या आठवणीत सेलिब्रिटी भावूक
3 शोलेतला ‘सुरमाँ भोपाली’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांचं निधन
Just Now!
X