21 November 2019

News Flash

Video : नोरा फतेहीवर आली कपडे विकण्याची वेळ

तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे

‘दिलबर दिलबर’ या गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनमुळे नावारुपाला आलेली नोरा फतेही तिच्या विशिष्ट नृत्यशैलीमुळे ओळखली जाते. अनेक वेळा नोरा सोशल मीडियावर तिच्या डान्सचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत असते. त्यामुळे तिची चाहत्यांमध्ये सतत चर्चा सुरु असते. त्यातच आता नोराने एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती चक्क कपडे विकताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

अफलातून डान्समुळे प्रत्येक चाहत्याच्या मनावर राज्य करणारी नोरा सध्या बॅकॉकमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. या दिवसातले काही फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत आहे. त्यातच तिने एक व्हिडीओ शेअर केला असून यात तिने खरेदी केलेले कपडे पुन्हा विकताना दिसत आहे. प्रत्यक्षात, नोरा हे फक्त एक नाटक करत आहे, ती खरोखरचं कपडे विकत नसून फक्त कपडे विकण्याची अॅक्टींग करत आहे. यामध्ये ती जमिनीवर बसून तिच्या आजूबाजुला कपड्यांचा पसारा दिसून येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नोरा सलमान खानच्या ‘भारत’ या चित्रपटामध्ये झळकली होती. या चित्रपटामध्ये तिने लॅटीन अमेरिकन महिलेची भूमिका वठविली होती. या चित्रपटानंतर नोरा लवकरच नृत्य दिग्दर्शक, दिग्दर्शक रेमो डिसुझाच्या ‘स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत वरुण धवन आणि श्रद्धा कपूर स्क्रीन शेअर करणार आहेत.

First Published on June 12, 2019 12:09 pm

Web Title: nora fatehi video goes viral on social media ssj 93
Just Now!
X