News Flash

Dance Video: माधुरी दीक्षित की नोरा फतेही? ठरवा तुम्हीच

दोघींचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय डान्स शो म्हणून ‘डान्स दीवाने ३’कडे पाहिले जाते. या रिअॅलिटी शोमध्ये बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित परिक्षक म्हणून काम करत आहेत. नुकताच या शोमध्ये अभिनेत्री, डान्सर नोरा फतेहीने हजेरी लावली. दरम्यान माधुरी आणि नोराने डान्स केला. पण माधुरीच्या गाण्यावरील नोराचा डान्स पाहून अनेकांनी तिला सुनावले आहे.

‘डान्स दीवाने ३’च्या सेटवरील माधुरी दीक्षित आणि नोराच्या डान्सचा व्हिडीओ कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघींमध्ये डान्स स्पर्धा सुरु असल्याचे दिसत आहे. माधुरीचा हिट चित्रपट ‘खलनायक’मधील ‘चोली के पीछे क्या है’ गाण्यावर नोरा डान्स करताना दिसत आहेत. तर तिला टक्कर देण्यासाठी माधुरीने ‘इक तो कम जिंदगानी’ या गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून ‘डान्स दीवाने ३’मधील हा भाग कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा : मालदिवला पोहोचल्यावर अभिनेत्याची करोना चाचणी आली पॉझिटिव्ह अन्…

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने तर ‘गुरु नेहमी गुरु असतो. माधुरी दीक्षित रॉक्स’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘माधुरी नेहमी बेस्ट आहे. डान्स दीवा’ असे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी ‘डान्सदीवाने ३’च्या सेटवर १८ जणांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर परिक्षक कोरिओग्राफर धर्मेश येलांडेला करोनाची लागण झाली आणि आता शोचा सूत्रसंचालक राघव जुयालला देखील करोना झाल्याचे समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 1:02 pm

Web Title: nora fatehi vs madhuri dixit on dance deewane 3 avb 95
Next Stories
1 राखी सावंतच्या आईचा कॅटवॉक; शेअर केला हॉस्पिटलमधला व्हिडिओ
2 Video: ओम आणि स्वीटूची ऑफस्क्रीन धमाल, जाणून घ्या सेटवरचे मजेशीर किस्से
3 “हे वर्ष माझ्यासाठी कठीण होतं पण…”; पतीच्या आत्महत्येनंतर मयुरी देशमुख म्हणाली…
Just Now!
X