05 July 2020

News Flash

चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळणे कठीण – गौतम गुलाटी

चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळणे खूप कठीण असल्याचे, 'बिग बॉस ८'चा विजेता गौतम गुलाटी सांगतो. छोट्या पडद्यावरील 'दिया और बाती' मालिका आणि 'बिग बॉस ८'

| April 1, 2015 03:49 am

चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळणे खूप कठीण असल्याचे, ‘बिग बॉस ८’चा विजेता गौतम गुलाटी सांगतो. छोट्या पडद्यावरील ‘दिया और बाती’ मालिका आणि ‘बिग बॉस ८’ या रिअॅलिटी शोचा विजेता गौतम लवकरच ‘उडनछू’ नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटात काम मिळणे कठीण असून, स्वबळावर या क्षेत्रात येण्याचे धाडस करणे सोपे नाही, असं गौतम सांगतो. जे स्वप्न मी उराशी बाळगले होते, ते आज प्रत्यक्षात उतरले आहे, ही भावना गौतमने ‘उडनछू’ चित्रपटाच्या मुहूर्ताच्या प्रसंगी व्यक्त केली. ‘सिध्दार्थ द बुध्दा’ आणि ‘डरपोक’ चित्रपटांमधून भूमिका साकारलेल्या गौतमने छोट्यापडद्यावरील ‘दिया और बाती’ मालिकेतदेखील काम केले आहे. ‘बिग बॉस ८’च्या विजयाने तो खऱ्या अर्थाने प्रसिध्दीच्या झोतात आला. ‘आर. व्हिजन प्रा. लि.’ची निर्मिती आणि विपिन पराशर यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाद्वारे सईशा सेहेगल ही नवोदीत अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.
gautamgulariembed450

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2015 3:49 am

Web Title: not a cakewalk to enter films gautam gulati
Next Stories
1 एक अभिनेत्री आणि नर्तकी म्हणून माझ्यात सुधारणा- सनी लिओनी
2 ‘कटय़ार’ आता मोठय़ा पडद्यावर!
3 हिंदी चित्रपटांनी विनोदी अभिनेत्यांना बाजूला सारले – सुरेश मेनन
Just Now!
X