News Flash

जावेद अख्तर नव्हे, तर ‘या’ अभिनेत्याला होती शबाना आझमींची पहिली पसंती

चित्रपटाच्या सेटवर झाली होती पहिली भेट

शबाना आझमी

‘अंकुर’ या चित्रपटातून १९७४ साली चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचा आज वाढदिवस. शबाना यांनी गेली अनेक वर्षे रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे. त्यांनी आतापर्यंत १२० हून अधिक हिंदी आणि बंगाली चित्रपटांतून भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी गीतकार आणि पटकथाकार जावेद अख्तर यांच्याशी लग्न केलं आहे. मात्र शबाना यांची पहिली पसंती जावेद अख्तर यांना नव्हती.

गीतकार जावेद अख्तर यांच्याशी लग्न करण्यापूर्वी शबाना आझमी यांचं नाव अभिनेता, दिग्दर्शक शेखर कपूरसोबत जोडलं गेलं होतं. ‘इश्क इश्क इश्क’ या चित्रपटाच्या सेटवर शबाना व शेखर यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्या काळी शबाना यांचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरत होता. तर शेखर कपूर यांनी कलाविश्वामध्ये फारसा जम बसवला नव्हता. परंतु शबाना यांच्याशी शेखर यांचं अफेअर असल्यामुळे ते कायम चर्चेत राहायचे. परंतु काही कारणास्तव या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आला आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शबाना यांनी जावेद अख्तर यांच्याशी लग्न केलं.

आणखी वाचा : निव्वळ देहबोलीतून पात्र उभं करणाऱ्या शबाना आझमी

दिग्दर्शक शाम बेनेगल यांच्या ‘अंकुर’ चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीला पाऊल ठेवणाऱ्या शबाना यांनी राष्ट्रीय चित्रपटांप्रमाणेच अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधून भूमिका वठविल्या आहेत. ‘जुनून’, ‘शतरंज के खिलाडी’, ‘कंधार’, ‘स्पर्श’, ‘पार’, ‘सती’, ‘अर्थ’ आणि ‘गॉडमदर’ इत्यादी एका पेक्षा एक सरस अशा चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. जॉन श्लेसिंगर यांचा ‘मॅडम सोऊसाटस्का’ आणि रोनाल्ड जॉफ यांचा ‘सिटी ऑफ जॉय’ या हॉलिवूड चित्रपटांमधून त्यांनी अभिनय केला आहे. शबाना या केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर त्यांचा अन्य क्षेत्रांमध्येही सक्रिय सहभाग असल्याचं पाहायला मिळतं. अभिनय करण्याबरोबर सामाजिक आणि स्त्रियांच्या अधिकाराच्या चळवळीतदेखील त्या सक्रिय असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 4:30 pm

Web Title: not javed akhtar but shabana azmi had crush on this actor director ssv 92
Next Stories
1 सुशांतला आगळीवेगळी श्रद्धांजली; चाहत्याने तयार केला मेणाचा पुतळा
2 “मणिकर्णिका, जा चीनवर हल्ला कर; तुझ्या घरापासून ‘एलएसी’वर जायला एकच दिवस लागतो”
3 “…तर मी ट्विटर कायमचं सोडेन”; कंगना रणौतनं दिलं आव्हान
Just Now!
X