News Flash

करिना आणि रणबीरच्या चाहत्यांची निराशा

रणबीर कपूर हा संजय दत्तच्या चरित्रपटामध्ये झळकणार आहे.

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर हा संजय दत्तच्या चरित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटासाठी करिना कपूर खानचेही नाव पुढे आले होते. संजय दत्तची बहिण प्रिया दत्तची भूमिका करिना साकारणार असल्याची चर्चा होती. पण या चित्रपटात करिना काम करणार नसल्याचे कळते.
एका कार्यक्रमाला करिनाने नुकतीचं उपस्थिती लावली होती. त्यावेळी तिने आपल्याला या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही असे सांगितले. त्यामुळे हा चित्रपट मी करतेय की नाही हा प्रश्न तर फार दूरचीच गोष्ट असल्याचे तिने म्हटले. यापूर्वी झोया अख्तरच्या ‘दिल धडकने दो’ या चित्रपटासाठी रणबीर आणि करिनाला विचारणा करण्यात आली होती. मात्र, दोघांनीही त्यावेळी हा चित्रपट नाकारला.
संजय दत्तवरील चरित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी करणार असून याची निर्मिती विधू विनोद चोप्राची असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2016 4:48 pm

Web Title: not offered role in sanjay dutt biopic kareena kapoor
टॅग : Ranbir Kapoor
Next Stories
1 मराठी भाषा दिनानमित्त उलगडणार कुसुमाग्रजांचा जीवनप्रवास
2 मराठीतील तीन दिग्गज प्रथमच एकत्र
3 मृणाल दुसानीसचे शुभमंगल; लग्नानंतर होणार अमेरिकावासी
Just Now!
X