चित्रपटसृष्टीची निर्मिती झाल्यापासून या चंदेरी दुनियेनेत अनेक नवीन कलाकारांना संधी दिल्या आहेत. त्यामुळेच कधी काळी नवोदित म्हणून ओळखले जाणारे कलाकार आज बॉलिवूडची शान म्हणून वावरताना दिसून येतात. मात्र नवोदित कलाकार ते एक नावाजलेला कलाकार हा प्रवास करताना या कलाकारांना अनेक चढउतार पाहायला मिळाले आणि त्यातूनच ते आज नावारुपाला आले आहेत. नवोदित ते नावजलेले कलाकार या यादीमध्ये हमखास नाव घेण्यात येतं ते म्हणजे महानायक अमिताभ बच्चन यांचं. अमिताभ बच्चन आज जरी बिग बी, महानायक या नावांनी ओळखले जात असले तरी त्यांनी त्याच्या आयुष्यात अनेक खस्ता खाल्ल्या आहेत. त्यानंतरच त्यांच्या वाट्याला हे सुख आल्याचं पाहायला मिळतं. वयाच्या ७५ व्या वर्षी एव्हरग्रीन असलेले अमिताभ सध्या अनेकवेळा जुन्या आठवणींमध्ये रमताना दिसतात आणि यापैकीच एक जुनी आठवण त्यांनी नुकतीच चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

उत्तम अभिनय कौशल्य, चित्रपटांची योग्य निवड आणि चित्रपटातील भूमिकेला दिलेला योग्य न्याय हे या अमिताभ यांचं खास वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे त्यांचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरत गेला. त्याकाळी १९७७-८७ साली प्रदर्शित झालेला ‘डॉन’ हा चित्रपट विशेष गाजला होता. या चित्रपटापेक्षा त्यातील गाण्यांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. या चित्रपटातील गाणी आजच्या तरुणाईच्या तोंडूनही ऐकायला मिळतात. विशेष म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशी या चित्रपटातील ‘खइके पान बनारसवाला’ हे गाणं हमखास लावलं जातं. मात्र या गाण्यामागील एक मोठ्या खुलासा अमिताभ यांनी केला आहे.

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

‘खइके पान बनारसवाला’ या लोकप्रिय गाण्यामध्ये अमिताभ बच्चन झळकले असून या गाण्याचा चित्रपटामध्ये समावेश करण्यात येणार नव्हता असं अमिताभ यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण झाल्यानंतर या गाण्याचं चित्रिकरण करण्यात आलं होतं. प्रथम या गाण्याची निर्मिती करावी किंवा त्याचा या चित्रपटात समावेश करावा याबाबत संपूर्ण टिममध्ये दुमत सुरु होतं. मात्र नंतर चर्चेमधून यावर तोडगा निघाला आणि हे गाणं चित्रपटामध्ये घेण्यात आलं’, असा खुलासा अमिताभ यांनी त्यांच्या ट्विटरवर केला. दरम्यान, या चित्रपटापेक्षाही ‘खइके पान बनारसवाला’ हे गाणं विशेष लोकप्रिय झालं. या चित्रपटामध्ये अमिताभ यांची दुहेरी भुमिका दाखविण्यात आली होती.