News Flash

नामवंत ओडिसी नृत्यांगणा लक्ष्मीप्रिया महापात्रा कालवश

मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

प्रख्यात ओडिसी नृत्यांगणा लक्ष्मीप्रिया महापात्रा यांचे शनिवारी रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्या 86 वर्षांच्या होत्या.  दिवंगत गुरु केलुचरण महापात्रा यांच्या त्या पत्नी होत्या. बर्‍याच दिवसांपासून महापात्रा आजारी असल्याचे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री नवीन पटनायक, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक मान्यवरांनी महापात्रा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी ओडिसी नृत्य क्षेत्रातील योगदानाची आठवण करून देत महापात्रा यांना श्रद्धांजली वाहिली.

 

काल रविवारी महापात्रांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 11:28 am

Web Title: noted indian odissi dancer laxmipriya mohapatra dies adn 96
Next Stories
1 रसिका सुनीलची नवी झेप; व्हिडीओ पाहून चाहते थक्क
2 कभी कभी, सिलसिला या चित्रपटांचे कथाकार सागर सरहदी काळाच्या पडद्याआड
3 भाईजानचा बच्चेकंपनीसोबत धमाल डान्स; व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
Just Now!
X