निर्माती एकता कपूर ‘लैला मजनू’ची ऐतिहासिक प्रेमकहाणी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर आणण्याच्या तयारीत आहे. हा चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली सादर करणार आहे. साजिद अली दिग्दर्शित या चित्रपटात काश्मीरमधल्या हिंदू- मुस्लीम जोडप्याची प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे.

‘मिड डे’नं दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीच्या प्लॅनवरून इम्तियाज आणि एकता यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी इम्तियाजच्या कल्पना वेगळ्या असल्याने एकताला त्या रुचत नसल्याचं समजतंय. त्याचप्रमाणे प्रमोशनची जबाबदारी एका नावाजलेल्या पीआर कंपनीकडे सोपवण्याचं एकताचं मत आहे तर याउलट इम्तियाजला एखाद्या सर्वसामान्य कंपनीकडून हे काम करून घ्यायचं आहे.

वाचा : ‘दिलबर’ फेम नोरा फतेहीला सलमानची लॉटरी

लैला- मजनू यांची प्रेमकहाणी नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न असल्याने त्याचं प्रमोशन मोठ्या प्रमाणावर नको, असं इम्तियाजला वाटतं. पण नवोदित कलाकारांची यात मुख्य भूमिका असल्याने सुरुवातीपासूनच त्याची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करावी असं एकताला वाटतं. आता दोघांमधील या मतभेदाचा परिणाम चित्रपटाच्या प्रदर्शनावर होणार का, याची चिंता दिग्दर्शकांना सतावत आहे.