News Flash

आता रिपीट्स बंद, ओरिजिनल सुरू..

प्रेक्षकांसोबतच कलाकारसुद्धा उत्सुक

आता रिपीट्स बंद, ओरिजिनल सुरू..

करोनाच्या संकटामुळे तीन महिन्यांपासून मालिकांचं चित्रीकरण बंद होतं. त्यामुळे सर्वच वाहिन्यांवर जुन्या मालिकांचं पुन:प्रक्षेपण सुरु झालं. मात्र आता हळूहळू सर्व पूर्वपदावर येत आहे. सरकारने दिलेल्या सर्व अटी-शर्थींचं पालन करुन आणि सेटवर आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन स्टार प्रवाहवरील मालिकांच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. मनोरंजनाने परिपूर्ण आणि तितकेच उत्कंठावर्धक एपिसोड्स घेऊन स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार, आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा, मोलकरीण बाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वैजू नंबर वन या मालिका सज्ज आहेत.

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपाची व्यक्तिरेखा साकारणारी रेश्मा शिंदे आपल्या सहकलाकारांना भेटण्यासाठी उत्सुक आहे. “मालिकेचा पहिला एपिसोड जेव्हा प्रसारित झाला तेव्हा मनात जेवढी धाकधूक होती तिच धाकधूक आता शूटिंग सुरु झाल्यानंतर असणार आहे. कार्तिक-दीपाच्या लग्नसोहळ्यावर मालिका येऊन थांबली होती. त्यामुळे यापुढील भाग खूपच उत्कंठावर्धक असतील. दीपाच्या आयुष्यात ज्याप्रमाणे नवं पर्व सुरु होत आहे त्याप्रमाणेच माझ्याही आयुष्यात नवं पर्व सुरु होत आहे. प्रेक्षकांच्या भेटीसाठी मी प्रचंड उत्सुक आहे,” असं रेश्मा म्हणाली.

सर्वांची लाडकी आई म्हणजेच ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी गोखले प्रभुलकर यांना सेट आणि सर्व सहकलाकारांची खूप आठवण येत होती. मात्र ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. “मनात प्रचंड उत्सुकता आहे. कधी एकदा सेटवर जातेय असं झालंय,” अशी प्रतिक्रिया मधुराणी यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2020 5:09 pm

Web Title: now repeat telecast will be closed and fresh will be telecast soon on star pravah ssv 92
Next Stories
1 टायगरच्या ‘बागी 3’ने केला ‘हा’ विक्रम
2 घराणेशाहीवरून टीका करणाऱ्यांना सोनम कपूरचं सडेतोड उत्तर; म्हणाली..
3 Father’s day 2020 : वडिलांचा फोटो शेअर करत बिग बींची हृदयस्पर्शी पोस्ट
Just Now!
X