मराठी चित्रपटसृष्टीतील टॉपच्या अभिनेत्रीपैकी एक म्हणजे सई ताम्हणकर. आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणारी सई नेहमीच तिच्या बोल्ड आणि सेन्शुअस व्यक्तिमत्वासाठी सिनेसृष्टीत ओळखली जाते. आता तिची इमेज बोल्ड, सेक्सी इतकीच राहणार नसून ती ‘टॉम बॉय’ सई म्हणूनही ओळखली जाणार आहे. सई तिच्या आगामी ‘क्लासमेट’ या चित्रपटात बाइक चालविताना दिसणार आहे. ‘क्लासमेट’ चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरु असून या चित्रपटाच्या सेटवर ती यमहा बाइक चालविताना दिसली.
सई ताम्हणकरचा अॅक्शन अवतार

आपला अभिनय अधिक उत्तम व्हावा यासाठी कलाकार विशेष मेहनत घेताना पाहावयास मिळत आहेत. सईदेखील यात मागे राहिली नसून, तिच्या ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’ या चित्रपटासाठी तिने बॉक्सिंगचे धडे घेतले. काही दिवसांपूर्वीच सई बॉक्सिंगचे धडे घेत असतानाचे फोटो प्रदर्शित करण्यात आले होते. बॉ़लीवूडमधील अभिनेत्री चित्रपटांसाठी बॉक्सिंग, बाइक चालवणे शिकत असतानाच आता मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीही मागे राहिलेल्या नाहीत हे सई घेत असलेल्या मेहनतीमुळे दिसत आहे.
सईचा हा नवा टॉम बॉय लूक तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल.