News Flash

घरात बसून कंटाळलात? ‘या’ अ‍ॅपवर पाहा फ्री चित्रपट

या आधी इरोस नाउने एका महिन्यासाठी फ्री सबस्क्रिप्शन दिले होते

घरात बसून कंटाळलात? ‘या’ अ‍ॅपवर पाहा फ्री चित्रपट

देशभरात करोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरात लॉकडाउनची घोषणा केली. करोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवणे हा एकमेव उपाय असल्याचे मोदींनी सांगितले. सर्व जनतेने पुढील २१ दिवस घरातच राहावे अशी विनंती मोदींनी देशातील लोकांना केली. अशावेळी घरात बसून काय करावे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सध्या छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांचे जुने भाग पुन्हा दाखवण्यात येत आहेत. त्यामुळे एका ओटीटी प्लॅटफॉर्मने फ्री चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

हा ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे अ‍ॅमेझॉन प्राईम आहे. नेहमी अ‍ॅमेझॉन प्राईम त्यांच्या यूजर्सला एक महिन्यांसाठी फ्री ट्रायल देतो.त्यानंतर यूजरला चित्रपट आणि मालिका पाहण्यासाठी पैसे भरावे लागतात पण आता अ‍ॅमेझॉनने थोडे बदल केले आहेत. अ‍ॅमेझॉन प्राइममध्ये चित्रपट पाहण्यासाठी आता यूजर्सला मेंबरशीप घेण्याची गरज नाही. केवळ तुमचे अॅमेझॉन खाते असणे गरजेचे आहे.त्यानंतर तुम्ही ते फ्री असलेले चित्रपट आणि मालिका पाहू शकता.

यामध्ये लहान मुलांसाठी वेगळा भाग आहे तर इतर लोकांसाठी वेगळा भाग आहे. लहान मुलांचा भागामध्ये अनेक अ‍ॅनिमेटेड चित्रपट आहेत. अ‍ॅमेझान प्राइम हा सध्या भारतात मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. तसेच लॉकडाउनच्या कळात अ‍ॅमेझॉनने घेतलेल्या या निर्णयामुळे यूजर्स आनंदी असल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 7:53 pm

Web Title: now you can watch free movies on amazon prime video avb 95
Next Stories
1 ‘बुलाता है मगर जाने का नही’, म्हणत अदाने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
2 करोनामुळे ह्रतिक-सुझान पुन्हा आले एकत्र
3 ‘जेव्हा आग आणि पाणी एकत्र येते’; अजय देवगणने पोस्ट केला RRRचा मोशन पोस्टर
Just Now!
X