News Flash

ट्रोल झालेल्या नुशरतच्या ‘त्या’ ड्रेसची किंमत ऐकून व्हाल थक्क!

नुशरतने हाई-स्लिट बॉटल ग्रीन गाऊन परिधान केला होता

अलिकडेच झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री नुशरत भरुचने परिधान केलेल्या गाऊनची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. काहींनी तिच्या या बोल्ड लूकची स्तुती केली. तर अनेकांनी तिला या कपड्यांच्या स्टाइलवरुन ट्रोल केलं. मात्र ‘मला जसं वागायचं आहे, तसंच मी वागेन’, असं बेधडक उत्तर नुशरतने टीकाकारांना दिलं. त्यामुळे ती चर्चेत आली होती. या पुरस्कार सोहळ्यात नुशरतने परिधान केलेला गाऊन हा सर्वसाधारण नसून त्याची किंमत चक्क लाखोंमध्ये आहे.

कलाविश्वातील सेलिब्रिटींच्या महागड्या वस्तू, गाडी, कपडे किंवा त्यांची लाइफस्टाइल यांची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते. यामध्येच नुशरतचा हाई-स्लिट बॉटल ग्रीन या गाऊनची विशेष चर्चा रंगली. अनेकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या गाऊनची किंमत जवळपास २ लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.


दरम्यान, नुशरतने परिधान केलेल्या गाऊनमुळे अनेकांनी तिला ट्रोल केलं असलं तरीदेखील कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींना तिचं कौतुक केलं. इतकंच नाही तर तिच्या हिंमतीला दादही दिली. बिग बॉसची माजी स्पर्धक मधुरिमा तुलीनेदेखील नुशरतचं कौतुक केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 2:25 pm

Web Title: nushrat bharucha green high slit gown price will make you shocked ssj 93
Next Stories
1 ‘टकाटक’ फेम रितीका आता नव्या भूमिकेत
2 अग्गंबाई सासूबाई : सोहमच्या बेलगाम वागण्याला आसावरी देणार चपराकीने उत्तर
3 ‘बधाई हो’च्या सीक्वेलमध्ये दिसेल ‘ही’ हटके जोडी
Just Now!
X