News Flash

या कारणामुळे नुसरतने तो टॅट्यू ठेवलाय अपूर्ण

नुसरतने हा टॅट्यू जॉर्जियामध्ये काढला होता. तिच्या या टॅट्यूमध्ये एक फीनिक्स पक्षी आहे.

नुसरतच्या टॅट्यू डिझाइनमध्ये एक फीनिक्स पक्षी आहे. (Photo Credit : Nushrratt Bharuccha Instagram)

बॉलिवुड अभिनेत्री नुसरत भरूचा अभिनया व्यतिरिक्त तिच्या फॅशनमुळे ओळखली जाते. नुसरत सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसत आहे. नुसरतने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये नुसरतचा एक टॅट्यू दिसतो. मात्र, खूप कमी लोकांना याची कल्पना आहे की हा टॅट्यू अर्धवट आहे. टॅट्यू अर्धवट ठेवण्यामागच कारण आज आपण जाणून घेणार आहोत.

नुसरतच्य पायावर टॅट्यू असल्याचे गेल्या वर्षी अॅमेझॉन प्राइमच्या फिल्मफेअर अवॉर्डसमध्ये माहित पडले. या अवॉर्ड शोमध्ये नुसरतने हिरव्या रंगाचा स्लिट ड्रेस परिधान केला होता. या स्लिट ड्रेसमुळे सगळ्यांचे लक्ष हे नुसरतच्या टॅट्यूने वेधले होते.

नुसरतने २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान जॉर्जियामध्ये हा टॅट्यू काढला होता. जॉर्जियामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण १० ते १२ दिवस सुरू होते. त्यावेळी नुसरतचे जास्त सीन नव्हते. त्यामुळे तिच्याकडे वेळ असल्याने तिने हा टॅट्यू काढला होता.

आणखी वाचा : ‘या’ अजब कारणामुळे शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

नुसरतच्या या टॅट्यू डिझाइनमध्ये एक फीनिक्स पक्षी आहे. ज्याच्या पंखांवर फूल आहे. नुसरतला हा पक्षी प्रचंड आवडला होता. त्यानंतर तिने ऑनलाइन टॅट्यू आर्टिस्ट शोधून हा टॅट्यू काढला होता.

आणखी वाचा : आई कुठे काय करते : अनिरुद्ध घेणार अरुंधतीसोबत घटस्फोट?

नुसरतने या टॅट्यू बद्दल सांगितले, हा टॅट्यू अजून पूर्ण झालेला नाही. एका तासानंतर नुसरत वेदना सहन करू शकत नव्हती. हा टॅट्यू काढायला जवळपास  ६ ते ७ तास लागले होते. नुसरतला यात अजून काही गोष्टी पाहिजे होत्या. मात्र, वेदना सहन करू शकत नसल्याने तिने हा टॅट्यू पूर्ण काढला नाही. नुसरतेने पुढे हे देखील सांगितले की जर कधी तिची इच्छा झाली तर ती त्या टॅट्यू आर्टिस्टला शोधून टॅट्यू पूर्ण काढून घेईन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 5:00 pm

Web Title: nushrratt bharuccha reveals that her tattoo is unfinished dcp 98
Next Stories
1 ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिका वादाच्या भोवऱ्यात, त्या दृश्या विरोधात तक्रार
2 १६ वर्षीय अभिनेत्रीवर फिदा होते राजेश खन्ना; डिंपल यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी
3 ‘चुकीची माहिती पसरवू नका’, त्या वक्तव्यामुळे हेमा मालिनी झाल्या ट्रोल
Just Now!
X