05 April 2020

News Flash

वाह! नुसरत जहाँचा साडीतला फोटो बघून चाहत्यांची दाद

सध्या नुसरत यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नुसरत या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर नुसरत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओ आणि फोटोंची कधी व्हाह व्हाह केली जाते तर कधी त्यांना फोटोंवरुन ट्रोल करण्यात येते.

नुकताच नुसरत यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नुसरत यांनी पिवळ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर डेनिम जॅकेट परिधान केले आहे. दरम्यान गळ्यात सुंदर नेकलेस आणि सनग्लासेस लावले आहेत. या लूकमध्ये नुसरत अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत आहेत. हा फोटो शेअर करत ‘थकलेली असतानाही दिलेली पोज’ असे कॅप्शन नुसरत यांनी दिले आहे.

 

View this post on Instagram

 

Tired yet posing.. #mixnmatch #denimwithsaree #daywear pic courtesy hubbilicious @nikhiljain09

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

नुसरत यांचा साडी नेसलेला हा फोटो चाहत्यांच्या चांगलाच पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट आणि लाईकचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने तुम्ही फार सुंदर दिसत आहात असे म्हटले आहे तर दुसरीकडे एकाने ‘ही कोणत्या प्रकारची फॅशन आहे?’ असा प्रश्न नुसरत यांना विचारला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2019 1:46 pm

Web Title: nusrat jaha shares sari photo on instagram avb 95
Next Stories
1 डेटिंग अ‍ॅपच्या मदतीने चाहत्याला गंडवलं, प्रसिद्ध अभिनेत्री पोलिसांच्या अटकेत
2 हिरकणी प्रेक्षकांना भावली : बोरिवलीत चालला रात्री बारापर्यंत शो
3 …त्याच्यासाठी श्रद्धा कपूरने मराठीतून पोस्ट करत म्हटलं ‘आय लव्ह यू’!
Just Now!
X