बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ या नेहमी चर्चेत असतात. कधी आपलं वक्तव्य तर कधी चित्रपटांच्या निमित्ताने नुसरत जहाँ यांची सोशल मीडियावर चर्चा सुरु असते. पण आता एका वेगळ्या कारणासाठी नुसरत या चर्चेत आहेत.
नुसरत यांनी २०१९मध्ये उद्योजक निखिल जैनशी लग्न केले. त्या दोघांचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते. पण आता नुसरत आणि निखिल यांच्या नात्यामध्ये दूरवा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. इतकच नव्हे तर नुसरत या एसओएस कोलकता चित्रपटामधील त्यांचा सहकलाकार यश दासगुप्ताला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता या सर्वावर नुसरत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
नुसरत यांना नुकताच एका मुलाखतीमध्ये या सर्वावर काही प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हा त्या म्हणाल्या की मला माझ्या खासगी आयुष्याबद्दल सर्वांसमोर बोलायला आवडत नाही. बऱ्याच वेळा लोकं माझ्यावर निशाणा साधतात पण यावर मी काही बोलू इच्छित नाही. एखादी चांगली गोष्ट असो किंवा वाईट, खासगी आयुष्याशी संबंधीत कोणत्याही गोष्टीवर नुसरत यांनी बोलण्याल नकार दिला.
View this post on Instagram
नुसरत यांनी या सर्व चर्चांवर बोलण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच त्या यश गुप्ताला डेट करत आहेत की नाही यामागील सत्य देखील समोर आलेले नाही. काही दिवसांपूर्वी नुसरत या यशसोबत राजस्थानमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना रंगल्या होत्या.
तर दुसरीकडे यश दासगुप्ताने यावर वक्तव्य केले. त्याने नुसरत यांच्या खासगी आयुष्याविषयी काही माहिती नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान यशने ते दोघे राजस्थानला गेले नसल्याचे देखील म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 9, 2021 4:08 pm