News Flash

ट्रोलर्सच्या नाकावर टिच्चून खासदार नुसरत जहाँने पोस्ट केला टिकटॉक डान्स व्हिडीओ

जेनिफर लोपाझ डान्स चॅलेंज पूर्ण करत त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

खासदार नुसरत जहाँ

पश्चिम बंगालमधील तृणमूलच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यांचे टिकटॉक व्हिडीओसुद्धा चर्चेचा विषय ठरतात. अनेकदा त्यांना यामुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता ट्रोलर्सच्या नाकावर टिच्चून त्यांनी नुकताच एक डान्स व्हिडीओ पोस्ट केला आहे. जेनिफर लोपाझ डान्स चॅलेंज पूर्ण करत त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

टिकटॉकचा हा व्हिडीओ त्यांनी ट्विटरवरसुद्धा शेअर केला. ट्रोलर्सना टोमणा मारत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, “माझ्या टिकटॉक अकाऊंटवरून आणखी एक व्हिडीओ इथे पोस्ट करत आहे. एक कलाकार नेहमीच इतरांचं मनोरंजन करत असतो. हॅपी ट्रोलिंग ट्रोलर्स!” अवघ्या काही वेळातच ट्विटरवरही या व्हिडीओला हजारोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत.

पाहा फोटो : सोनाली कुलकर्णी ते रिंकू राजगुरू; विनामेकअप अशा दिसतात मराठी तारका

हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपाझने टिकटॉकवर चाहत्यांना एक डान्स चॅलेंज दिला होता. हा डान्स गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फार ट्रेण्ड होत आहे. अनेक कलाकारांनी हा डान्स चॅलेंज पूर्ण करत त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात आता नुसरत जहाँ यांचाही समावेश झाला आहे.

नुसरत जहाँ यांनी लॉकडाउनदरम्यान काही वर्कआऊटचेही फोटो, व्हिडीओ पोस्ट केले होते. नेटकऱ्यांकडून त्याला चांगलीच पसंती मिळाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2020 2:03 pm

Web Title: nusrat jahan post tiktok dance video and says happy trolling ssv 92
Next Stories
1 करोनावरील पहिला चित्रपट प्रदर्शित; पाहून अंगावर येईल काटा
2 ‘महाभारत’च्या कलाकारांना मिळायचं एवढं मानधन, रक्कम ऐकून बसणार नाही विश्वास
3 “अखेर न्याय मिळाला”; तुरुंगातून सुटताच अभिनेत्याने केले ट्विट
Just Now!
X