तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी नुकताच बाळाला जन्म दिला आहे. बाळाच्या जन्मापासूनच नुसरत जहाँ चांगल्याचं चर्चेत आहेत. आई झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या सोशल मीडियावरदेखील सक्रिय झाल्या आहेत. ग्लॅमरस फोटो शेअर करत त्यांनी पुन्हा एकदा चाहत्यांसोबत संवाद साधण्यास सुरुवात केलीय. एकीकडे नुसरत यांच्या बाळाचे वडील कोण याबाबत नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु असतानाच आता नुसरत जहाँ आणि त्यांचा कथित प्रियकर यशदास गुप्ता यांचा एक रोमॅण्टिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नुसरत जहाँ यांनी पती निखल जैन यांच्यापासून विभक्त झाल्याचं जाहीर केल्यापासूनच त्या चर्चेत आल्या आहेत. तसचं त्याचं नावं अभिनेता यशदास गुप्तासोबत जोडलं जातं आहे. अशातच नुसरत यांनी इन्स्टाग्रामवरील त्यांच्या चाहत्यांनी तयार केलेला एक व्हिडीओ त्यांच्या इन्स्टास्टोरीला शेअर केला होता. या व्हिडीओत नुसरत आणि यशदास यांच्यातील केमिस्ट्री पाहायला मिळतेय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हे देखील वाचा: ब्रा फ्लॉन्ट केल्याने उर्फी जावेद झाली होती ट्रोल, म्हणाली “प्रसिद्धीच हवी होती तर कपडे न घालताच गेले असते”

हे देखील वाचा: काय ‘मनी हाइस्ट’मध्ये विराट कोहली आणि बॉबी देओल?; नेटकऱ्यांकडून धमाल मीम्स व्हायरल

नुसरत जहाँ आणि यशदास गुप्ता यांच्या फॅनग्रुपने हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी नुसरत आणि यशदास यांना शुभेच्छा दिल्या आगेत. “ईशानच्या जन्माच्या यशरत यांना शुभेच्छा” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलंय. नुसरत जहाँ यांनी हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टास्टोरीला शेअर केल्याने नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगल्या आहेत.

‘यशरत’ असं कॅप्शन असलेला व्हिडीओ नुसरत यांनी शेअर केल्याने त्यांनी एकाप्रकारे यशदास गुप्तासोबत असलेल्या नात्याची कबुली दिली आहे. शिवाय नुसरत यांना मुलगा झाल्याची बातमी देखील यशदास गुप्ता यांनीच शेअर केली होती. असं असलं तरी अद्याप नुसरत जहाँ आणि यशदास गुप्ता यांनी त्यांच्या नात्याची जाहीरपणे कबुली दिलेली नाही.