इप्सिता आर्ट्स आणि पंढरी प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठीतील हॉरर-कॉमेडी प्रकारातील ‘ओ मेरा पिया घर आया’ हे नाटक रंगभूमीवर सादर होणार आहे. नाटकाचा मुहूर्त नुकताच मुंबईत दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे पार पडला. ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘फू बाई फू’ या कार्यक्रमातून आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता अंशुमन विचारे या नाटकात एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकासमोर येणार आहे. नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग येत्या ३१ जुलै रोजी होणार आहे.प्रसाद दाणी लिखित आणि प्रसाद खांडेकर दिग्दर्शित या नाटकात अंशुमनसह आशुतोष वाडेकर, राहुल बेलापूरकर, स्नेहा मंगल हे कलाकार आहेत. प्रगती सरदेसाई व डॉ. अतुल डोंगरे हे नाटकाचे निर्माते आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 17, 2016 12:17 am