प्रेक्षकांच्या मागणीनुसार जुन्या चित्रपटांचे सिनेमागृहात विशेष खेळ

‘अमुक चित्रपट मोठय़ा पडद्यावर पाहायला हवा होता’ अशी हुरहुर अनेकदा चित्रपटवेडय़ांना लागून राहते; पण चित्रपट जुना झाल्यामुळे किंवा अपुऱ्या प्रतिसादामुळे अल्पावधीतच चित्रपटगृहांच्या तिकीटबारीवरून उतरतो आणि आपली इच्छा अपूर्णच राहते; परंतु आता तुम्हाला असा एखादा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहातील मोठय़ा पडद्यावर पाहायची संधी उपलब्ध झाली आहे. ‘पीव्हीआर’ या चित्रपटगृहांची साखळी चालवणाऱ्या कंपनीने सिनेरसिकांच्या सामूहिक मागणीनुसार जुन्या ‘क्लासिक’ किंवा अगदी तीन-चार वर्षांपूर्वीपर्यंतच्या गाजलेल्या चित्रपटांचे विशेष खेळ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

दूरचित्रवाणीवर आपल्याला हवा तो चित्रपट पाहण्याची सुविधा डीटीएच कंपन्यांमार्फत सध्या पुरवली जाते; परंतु अनेकदा एखादा चित्रपट मोठय़ा पडद्यावर पाहण्याचा अनुभव वेगळा असतो. त्यामुळेच ‘पीव्हीआर’ने ‘डिजिटल इनिशिएटिव्ह’ विभागातर्फे ‘वकाऊ’ या नावाने ‘थिएटर ऑन डिमांड’ (मागणीनुसार चित्रपटगृह) ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सिनेरसिकांना परिवार किंवा मित्रमंडळींसमवेत एकत्र बसून चित्रपटगृहात जुन्या चित्रपटांचा आनंद लुटता येणार आहे. याबाबतची घोषणा ‘पीव्हीआर’ने जानेवारी महिन्यातच केली होती; परंतु त्याची सुरुवात आता करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, वाढदिवसापासून सार्वजनिक सुटीच्या दिवशी पसंतीच्या चित्रपटांच्या खेळासाठी चित्रपटगृहांची नोंदणीही त्यावर सुरू झाली आहे.

देशभरात पीव्हीआरची सर्व चित्रपटगृहे याकरिता उपलब्ध होतील. ग्राहक आपल्याला पाहिजे त्या दिवशी चित्रपट आणि वेळ निवडू शकतात. सध्या यात जुन्या ‘सिलसिला’पासून ते ‘बजरंगी भाईजान’पर्यंतच्या ५०० चित्रपटांचा समावेश आहे. केवळ गाजलेल्याच नव्हे तर हॉलीवूडपट आणि प्रायोगिक चित्रपटांचाही यामध्ये समावेश आहे. या यादीत लवकरच मराठीसह अन्य भाषक चित्रपटांचाही समावेश होणार असल्याचे पीव्हीआर पिक्चर्सच्या डिजिटल इनिशिएटिव्हचे प्रमुख करण अहुजा यांनी सांगितले. नुकताच एका प्रेक्षकाने आपल्या मुलाचा पाचवा वाढदिवस त्याच्या मित्रांसाठी ‘आईस एज’ या चित्रपटाच्या खेळाचे आयोजन करून साजरा केला होता, असेही ते म्हणाले.

सुविधा अशी..

  • वकाऊच्या https://www.vkaao.com/ या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावयाची आहे.
  • नोंदणी झाल्यानंतर आपल्या शहरातील चित्रपटगृह व चित्रपटाची निवड करून खेळ निश्चित करता येतो.
  • हा खेळ ‘वकाऊ’च्या संकेतस्थळावर झळकविला जातो.
  • या सिनेमांसाठी प्रतिप्रेक्षक किमान ९० ते कमाल १४० रुपये इतके तिकीटदर ठेवण्यात आले आहेत.
  • प्रत्येक खेळासाठी किमान प्रेक्षकसंख्येची मर्यादा वेगळी असून १५ ते ४४ प्रेक्षकांची मर्यादा ठेवण्यात आली आहे.

चित्रपटगृहात फार काळ न चालणारे चित्रपट काही काळानंतर पाहण्यासाठी गर्दी होते. अशा चित्रपटांसाठीही यानिमित्ताने एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. भविष्यात इतर चित्रपटगृहे कंपन्यांशीही सहकार्य करार करून त्यांच्या चित्रपटगृहांमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा विचार आहे.

करण अहुजा, पीव्हीआरच्या डिजिटल इनिशिएटिव्हचे प्रमुख