शरीराचा आकर्षक बांधा, सुंदर शरिरयष्ठी असलेला आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा सध्या अनेक बॉलिवूड अभिनेत्रीचा हॅंडसम हंक बनलाय. अभिनेत्री कतरिना कैफसुद्धा त्याची मोठी फॅन बनली आहे. नीरजने ऐतिहासिक सुवर्णपदकासह भारताची पदकसंख्या सातपर्यंत नेली. त्यामुळे लंडन ऑलिम्पिकमधील सहा पदकांचा विक्रम भारताने यंदा मोडीत काढला. नीरज चोप्रावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान नीरज चोप्राने नुकतंच एक्सप्रेस अड्ड्यावर मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी अभिनेत्री कतरिना कैफने तिच्या आवडता हॅंडसम हंक नीरज चोप्राला विचारलेल्या प्रश्नांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

सुवर्णपदक नीरज चोप्रा याच्याशी मनमोकळा संवाद साधण्यासाठी एक्सप्रेस अड्ड्यावर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी पाहुणे उपस्थित होते. यात सुप्रसिद्ध क्रिकेटर इरफान पठाण, मोहम्मद कैफ आणि भारताचे माजी नियंत्रक आणि महालेखापाल विनोद राय यांच्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफ देखील उपस्थित होती. सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राच्या कामगिरीने अभिनेत्री कतरिना कैफ देखील त्याची फॅन बनली असल्याचं यापूर्वी अनेकदा तिने सांगितलं आहे. नुकतंच पार पडलेल्या एक्सप्रेस अड्ड्यावर अभिनेत्री कतरिना कैफ हिने नीरज चोप्राला अनेक प्रश्न विचारून मनमोकळा संवाद साधला. खेळाडूंसाठी त्याच्या फिटनेसचं महत्त्व काय असतं आणि ते कशा पद्धतीने त्यांच्या उपयोगी पडतं, या विषयावर अभिनेत्री कतरिना कैफने नीरज चोप्राला अनेक प्रश्न विचारले.

आणखी वाचा: “त्याचा मृत्यू हार्ट अटॅकने होऊच शकत नाही…”; सिद्धार्थ शुक्लाच्या जिम ट्रेनरचा दावा

आणखी वाचा : Sidharth Shukla funeral: सिद्धार्थच्या अंतिम संस्कारावेळी संभावनाचा पोलिसांसोबत वाद?

यावेळी बोलताना अभिनेत्री कतरिना कैफ म्हणाली, “ऑलिम्पिकमधील तुझी कामगिरी आणि तू जे साध्य केलं आहे, त्यामूळे संपूर्ण देशाला प्रेरणा मिळाली आहे आणि माझ्यासाठीही एक व्यक्ती म्हणून वैयक्तिक प्रेरणा मी घेत असते. तु स्वतःला फिटनेससाठी झोकून दिलंय आणि फिटनेस हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा विषय आहे. तू यात स्वतःला कसं झोकून दिलंस, तुम्ही स्वतःला कसं प्रशिक्षण दिलंस आणि तू जे साध्य केलंस हे पाहणं माझ्यासाठी खरोखरच प्रेरणादायी आहे. नवीन पिढीसाठी आणि संपूर्ण देशासाठी महत्त्वाचं आहे. मला फिटनेसबाबत जागृती व्हायला हवी, असं मला वाटंतय. लोक तुझ्याकडे प्रेरणा म्हणून पाहतात आणि त्यांच्या स्वतःच्या फिटनेसबद्दल प्रोत्साहित होतात.”