संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त गुरुवारी मतदान करण्यास बाहेर पडली. मात्र, यावेळेस मान्यता ओळखण्यातही येत नव्हती.
आपल्या पतीच्या पाठीशी नेहमी उभी असणारी मान्यता आजारपणामुळे फार बारीक झालेली दिसली. तिचे वजन फारच कमी झाली आहे. दोन मुलांच्या आई असलेल्या मान्यताने तिचे लांबसडक केस कापल्यामुळेही ती आता ओळखण्यात येत नाही आहे. पुढील छायाचित्रात ती मतदानकेल्यावर कॅमे-यास पोज देताना दिसत आहे.


अभिनेता आणि मान्यताचा पती संजय दत्तने पत्नीच्या आजारपणासाठी तिनदा पॅरोल घेतली होती. संजयला लागोपाठ मिळालेल्या पॅरोलमुळे चर्चांना अधिकच उधाण आले होते. जेव्हा संजय दत्त २२ मार्चला येरवडा तुरुंगात जाण्यासाठी परतत होता त्यावेळेस मान्यता शेवटची कॅमे-यासमोर दिसली होती. त्यावेळेस तिची प्रकृतीही ठीक दिसत होती.


तसेच, डिसेंबर महिन्यात ती शाहिद कपूरच्या आर.राजकुमार चित्रपटाच्या पार्टीतही दिसली होती. त्यामुळे तिची प्रकृती ठीक असून, तिला काहीही झाले नसल्याच्या बातम्या जोर धरू लागल्या होत्या. या पार्टीनंतर मान्यता शाहीद आणि आयुषमान खुरानासोबत क्रिशिका लुल्लाच्या वाढदिवसाला गेली होती.

मात्र, पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी संजयला पॅरोल देण्यापूर्वी मान्यताच्या आजारपणाबाबत संपूर्ण चौकशी केल्याचे सांगितले. तिच्या फुप्फुसांमध्ये गाठ असल्यामुळे छातीत दुखणे आणि वजन कमी होण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे. तिच्यावर दोनदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.