News Flash

‘परफ्युम’ मधून अभिनेता ओंकार दीक्षितचं चित्रपटसृष्टीत पदार्पण!

हा चित्रपट १ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

चित्रपटसृष्टी ही विलक्षण गोष्ट आहे. कारण इथे अनुभव महत्त्वाचा असतोच पण नव्याची ऊर्जाही तितकीच महत्त्वाची असते. अशीच नवी उर्जा घेऊन ओंकार दीक्षित हा नवा अभिनेता प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘परफ्युम’ या चित्रपटातून ओंकार चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय. या चित्रपटात तो जीवनाच्या प्रत्येक वाटेवर संषर्घ करणाऱ्या गरीब घरातील मुलाची भूमिका साकारत आहे. एका मुलीच्या येण्यानं त्याचं आयुष्य कसं बदलतं याची गोष्ट ‘परफ्युम’ मधून सांगण्यात आली आहे.

‘या चित्रपटात काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय होता. कारण चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना ही भूमिका करण्याची संधी मिळाली. या भूमिकेसाठीचा प्रवास २०१६ पासून सुरू झाला भूमिकेसाठी वजन वाढवणं आवश्यक होतं त्यामुळे वजन वाढवण्यासाठी जिमला जाणं, स्विमिंग, सायकलिंगही मला शिकावं लागलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या भाषेवर, अभिनयावर, हावभावांवर मला खूपच काम करावं लागलं. त्यामुळे खऱ्या अर्थानं या चित्रपटानं माझी जडणघडण केली असं म्हणत ओंकारनं आपला अनुभव सांगितला.

‘हलाल’सारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या, तसेच आगामी ‘लेथ जोशी’ चित्रपटाची प्रस्तुती करणाऱ्या अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनी ‘परफ्युम’ची प्रस्तुती केली आहे. एचआर फिल्मडॉमच्या डॉ. हेमंत दीक्षित आणि ओंकार दीक्षित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर दिग्दर्शक आणि कॅमेरामन म्हणून करण तांदळे यांनी काम पाहिले आहे. ओंकार आणि मोनालिसा बागल यांच्यासह चित्रपटात सयाजी शिंदे, चिन्मय मांडलेकर, भाग्यश्री न्हालवे, अभिजित चव्हाण, अनिल नगरकर, कमलेश सावंत यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. किशोर गिऱ्हे यांची कथा असून, पॉल शर्मा यांनी संकलन केलं आहे. हा चित्रपट १ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 3:49 pm

Web Title: omkar dixit debut in marathi film perfume
Next Stories
1 Koffee With Karan Controversy : हार्दिक, के.एलनं त्यांच्या चुकीची शिक्षा भोगली- करण जोहर
2 Video : बॉलिवूडच्या क्वीननं वाहिली बाळासाहेबांना आदरांजली
3 गोविंदा आणि माझं करिअर संपवण्याचा ‘ग्लॅमरस माफियां’चा डाव, पहलाज निलहानींचा आरोप
Just Now!
X