07 August 2020

News Flash

चित्रपटगृह बंद! आता ‘ओटीटी’वर होणार एकाच दिवशी ४ चित्रपटांची टक्कर

बॉलिवूडच्या चार मोठया चित्रपटांचा आता OTT वर सामना

करोना व्हायरसमुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटगृहे पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टीने चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा मार्ग निवडला आहे. पण आता एकाच दिवशी चार चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

येत्या ३१ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चार चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांमध्ये विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’, कुणाल खेमूचा ‘लूटकेस’, नवाजुद्दीन सिद्दिकीचा ‘रात अकेली है’ आणि विद्युत जामवालाचा ‘यारा’ या चित्रपटांचा समावेश आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे.

तसेच चारही चित्रपट वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. विद्या बालनचा हा चित्रपट प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विद्या बालनसोबत सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सान्या शकुंतला देवी यांच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर अमित साध आणि जिस्शु सेनगुप्ता देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन यांनी केले आहे.

अभिनेता कुणाल खेमूचा ‘लूटकेस’ हा चित्रपट डिझनी हॉटस्टावर प्रदर्शित होणार आहे.

तर विद्युत जामवालाचा ‘यारा’ हा चित्रपट झी५वर प्रदर्शित होणार आहे.

नवाजुद्दीन सिद्दिकीचा ‘रात अकेली है’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा एक क्राईम मिस्ट्री प्रकारातील चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. नवाजसोबत या चित्रपटात राधिका आपटे, स्वानंद किरकिरे, आदित्य श्रीवास्तव, तिग्मांशू धूलिया, पद्मावती राव, शिवानी रघुवंशी असे दर्जेदार कलाकार झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 3:11 pm

Web Title: on a same day 4 movies going to release on ott platform avb 95
Next Stories
1 विकास दुबेचा एन्काऊंटर आता मोठ्या पडद्यावर; कुख्यात गुंडावर येतोय चित्रपट
2 १६व्या वर्षी ‘हा’ अभिनेता करणार होता आत्महत्या; कारण ऐकून व्हाल थक्क…
3 सुशांतला श्रद्धांजली देण्यासाठी अंकिताने केली ‘पवित्र रिश्ता’च्या सीक्वलची मागणी
Just Now!
X