News Flash

जागतिक महिला दिवस : वामिका आणि अनुष्काचा फोटो शेअर करत विराट म्हणाला..

पाहा फोटो

जगभरात दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिवस साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरुक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. या निमित्ताने प्रत्येक व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या स्त्रिला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना दिसतात. त्यातच आता भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने देखील त्याच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या स्त्रियांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

विराटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अनुष्का आणि त्यांची मुलगी वामिका दिसत आहे. “एखाद्या बाळाचा जन्म पाहणे म्हणजे अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक अनुभव आहे. ते पाहिल्यानंतर, तुम्हाला एका महिलेचे सामर्थ्य समजते, आणि परमेश्वरानं मातृत्वाचं वरदान स्त्रियांनाच का दिलं हे समजते. कारण त्या पुरूषांपेक्षा शक्तिशाली आहेत. माझ्या आयुष्यातील सगळ्यात उत्कट आणि दयाळू महिलेला आणि एक जी मोठी होऊन तिच्या आई सारखी होणार तिला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जगातील सर्व आश्चर्यकारक महिलांनाही महिला दिनाच्या शुभेच्छा.” अशा आशयाचे कॅप्शन विराटने त्या फोटोला दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

अनुष्का शर्माने ११ जानेवारी रोजी मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिने १ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मुलीच्या नावाची घोषणा केली होती. इन्स्टाग्रामवर  पोस्ट लिहित अनुष्कानं मुलीचं नाव ‘वामिका’ ठेवल्याचं जाहीर केलं.

दरम्यान, विराटने आपल्या मुलीच्या जन्मानंतर ट्विटर बायो मध्येही बदल केला होता. विराटच्या नवीन ट्विटर बायोने चाहत्यानचे लक्ष वेधले होते. विराट कोहलीने आपले ट्विटर बायो बदलत – ‘अभिमान वाटावा असा पती आणि वडिल’!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 2:29 pm

Web Title: on international womens day virat kohli shared a photo of anushka and vamika dcp 98
Next Stories
1 तब्बल सहा महिन्यांनी रिया चक्रवर्तीची पोस्ट, शेअर केला ‘हा’ फोटो
2 वाढते वजन राष्ट्रीय मुद्दा बनला म्हणून, विद्या करत होती स्वत:चा तिरस्कार..
3 करीनाच्या बाळाची पहिली झलक, महिला दिनानिमित्त करीनाचं सरप्राइज
Just Now!
X