दिवंगत अभिनेता इरफान खानचा जन्म ७ जानेवारी रोजी झाला होता. या दिनानिमित्त इरफान खानचा खूप चांगला मित्र व दिग्दर्शक शूजित सरकार याने पिकू या चित्रपटाच्या सेटवरील काही आठवणी सांगितल्या आहेत.

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शूजित म्हणाला, “पिकू चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी इरफान म्हणाला, दादा आपण असंच शूट सुरू ठेवू शकत नाही का? मला इथे मुक्त पक्षी असल्यासारखे वाटत आहे. हा क्षण इथे थांबवण्याची माझी इच्छा नाही. सेटवर तुम्ही माझ्याकडून कोणतही काम करून घ्या. दादा, आपण असंच पुढे पुढे जाऊ शकत नाही का?” इरफानबद्दल सांगताना शूजित भावूक झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by @shoojitsircar

इरफान आणि शूजितने अनेक प्रोजेक्टवर एकत्र काम केले आहे. उधम सिंग या बायोपिकमध्ये इरफान खान आणि शूजित पुन्हा एकदा एकत्र येणार होते. इरफान या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार होता. पण अकाली मृत्युमुळे आता ही भूमिका विकी कौशल साकारत आहे.

आणखी वाचा : ‘तुझी जाण्याची वेळ योग्य नव्हती…’ एका चाहतीचं इरफानसाठी पत्र

इरफान खानने २९ एप्रिल रोजी मुंबईच्या कोकिलाबेन धिरूभाई अंबानी या रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली होती. फक्त भारतच नाही तर जगभरात इरफान खानचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. इरफानने फक्त हिंदी नाही तर हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं. इरफानने छोट्या पडद्यावरुन आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. मेहनतीच्या जोरावरच त्याने यश मिळवलं होतं.