18 January 2019

News Flash

मी कायमस्वरुपी तुरुंगात जाईन असं तुम्हाला वाटलं का? -सलमान खान

सलमानला दोषी ठरवत जोधपूर न्यायालयातील न्या. देवकुमार खत्री यांनी त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली

सलमान खान

बॉलिवूडचा दबंग भाई सलमान खानचा आगामी सिनेमा रेस ३ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर लॉन्चवेळी सलमानसह सिनेमाची इतर स्टारकास्टही उपस्थित होती. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अर्थातच साऱ्यांचे प्रश्न हे सलमानशी निगडीतच होते. सुरूवातीला सलमान पत्रकारांच्या प्रश्नांना शांतपणे उत्तर देत होता. पण नंतर एका पत्रकाराने त्याला जोधपूर न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेसंबंधी प्रश्न विचाराल. हा प्रश्न ऐकून सलमान चांगलाच भडकला.

salman khan सलमान खान

पत्रकाराने सलमानला, ‘काळवीट शिकार प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा सिनेमाविषयी चिंता होती का आणि भीती वाटली का?’ हा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव स्पष्ट दिसत होते. मात्र त्याने या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले नाही. ‘मी कायमस्वरुपी तुरुंगात जाईन असं वाटलं का?’ असा प्रतिप्रश्न त्याने केला. ‘मी अजिबात घाबरलो नव्हतो’ असेही सलमान पुढे म्हणाला.

‘हम साथ साथ है’ सिनेमाच्या शुटिंगदरम्यान सलमानने काळविटाची शिकार केली होती. ५ एप्रिल रोजी सलमान काळवीट शिकारप्रकरणात दोषी ठरला होता. सलमानला वन्यजीव संरक्षण कायद्याच्या ९/५१ या कलमान्वये दोषी ठरवण्यात आले असून या गुन्ह्यासाठी ६ वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतदू आहे. काळवीट हा लुप्तप्राय पाणी असून त्याचा समावेश वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या पहिल्या अधिसूचीत करण्यात आला आहे.

salman khan सलमान खान

सलमानला दोषी ठरवत जोधपूर न्यायालयातील न्या. देवकुमार खत्री यांनी त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यानंतर सलमान दोन दिवस जोधपूर तुरुंगात होता. सध्या तो जामिनावर बाहेर असून जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्याला परदेशवारी करण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी घ्यावी, अशी अट ठेवली होती.

First Published on May 17, 2018 5:08 pm

Web Title: on race 3 trailer launch event salman khan gets angry on blackbuck quetion