02 April 2020

News Flash

वाढदिवसानिमित्त सैफची चाहत्यांना खास भेट, ‘लाल कप्तान’चा टीझर प्रदर्शित

‘लाल कप्तान’ हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे स्पष्ट झाले

‘लाल कप्तान’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असलेला बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आज १६ ऑगस्ट रोजी त्याचा ४९वा वाढदिवस साजरा करत आहे. या चित्रपटात सैफ अली खान नागा साधूंच्या रुपात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझर प्रदर्शित होताच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही समोर आली आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे हा टीझर शेअर केला आहे. ३६ सेकंदाच्या या टीझरमध्ये सैफ अली खान कपाळी विभूती लावताना दिसत आहे. कपाळी कुंकवाचा टीळा, काजळ लावलेले डोळे असा नाना साधूंचा अनोख्या लुकमध्ये सैफ अली खान दिसत आहे. सैफचा हा लुक पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘लाल कप्तान’ हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन नवदीप सिंग करत आहेत. तसेच या चित्रपटाची संपूर्ण कथा नागा साधू यांचा जीवना भोवती फिरताना पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील सैफची भूमिका ही त्याच्या आता पर्यंतच्या करिअरमधील आव्हानात्मक भूमिका असणार आहे. त्यामुळे चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.

‘सैफ हा खूप चांगला कलाकार आहे आणि या चित्रपटातील भूमिकेतून सैफच्या अभिनयातील एक नवा पैलू पाहायला मिळणार आहे’ असे चित्रपट निर्माते सुनिल लुल्ला यांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2019 1:39 pm

Web Title: on saif ali khan birthday laal kaptan movie teaser is release avb 95
Next Stories
1 Happy Birthday Saif Ali Khan : केवळ ‘या’ अटीवर करिनाने बांधली सैफशी लग्नगाठ
2 “सरकारला कधी जाग येणार?”, ‘ये रे ये रे पैसा २’ चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याने प्रसाद ओकचा संताप
3 ‘मिशन मंगल’ची पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर इतक्या कोटींची झेप
Just Now!
X