26 February 2021

News Flash

तैमूरच्या वाढदिवसानिमित्त करीनाची खास पोस्ट, “तुझ्या अम्माशिवाय कोणीच..”

करीनाने तिच्या मुलाविषयीचं प्रेम या पोस्टमध्ये व्यक्त केलं आहे.

अभिनेत्री करीना कपूर खानने मुलाच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे. करीना आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर चार वर्षांचा झाला आहे. यानिमित्त करीनाने त्याचा एक फोटो आणि व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. या पोस्टद्वारे करीनाने तिच्या मुलाविषयीचं प्रेम शब्दांत व्यक्त केलं आहे.

“माझ्या मुला.. वयाच्या चौथ्या वर्षीच तुझ्याकडे असलेला दृढनिश्चय, आत्मसमर्पण आणि लक्ष केंद्रीत करण्याची वृत्ती पाहून मला फार आनंद होतो. माझ्या मेहनती मुलावर देवाचा सदैव आशीर्वाद असो. पण वाटेत बर्फवृष्टीचा आनंद घेण्याला, फुलांशी खेळायला, इकडे-तिकडे बागडायला आणि वाढदिवसाचा संपूर्ण केक खायला विसरू नकोस. तुझ्या स्वप्नांचा पाठलाग कर आणि या सर्वांपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुला आनंद देणाऱ्या गोष्टी करायला विसरू नकोस. तुला तुझ्या अम्माशिवाय जास्त कोणीच, कधीच प्रेम करू शकत नाही. टिम, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा”, अशा शब्दांत करीनाने तिच्या भावना व्यक्त केल्या.

यासोबतच करीनाने तैमूरचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तो प्राण्यांसोबत खेळताना, गवत उचलताना, बर्फात खेळताना पाहायला मिळत आहे. तैमूरचा स्टारडम एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. त्याचे फोटो आणि व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल होतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2020 12:22 pm

Web Title: on son taimur birthday kareena kapoor shares unseen pics and a heartfelt note ssv 92
Next Stories
1 नेहाला माझं सुख बघवत नाही- आदित्य नारायण
2 गौहर खानची हटके लग्नपत्रिका; व्हिडीओतून दाखवली ‘लॉकडाउन लव्हस्टोरी’
3 ईशा केसकरच्या घरी सिद्धार्थ-मितालीचं पहिलं केळवण; पाहा फोटो
Just Now!
X