01 March 2021

News Flash

विकी कौशलने केली नव्या चित्रपटाची घोषणा; शेअर केला ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’चा पोस्टर

उरी या चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधत केली नव्या चित्रपटाची घोषणा

भारतीय सेनेने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारीत ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफान गाजला होता. हा चित्रपट ११ जानेवारी २०१९मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज २ वर्ष पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने अभिनेता विकी कौशलने त्याच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला आहे. हा पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

विकीच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ असं आहे. हा चित्रपट महाभारतातील एका पात्रावर आधारीत असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट सायन्स फिक्शन आणि थ्रिलर आहे. विकीने दोन पोस्टर ट्वीट केले आहेत. “मी अत्यंत उत्साही आणि आनंदी आहे. उरी – द सर्जिकल स्ट्राइकला दोन वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त साधत तुम्हाला द इम्मॉर्टल अश्वत्थामाची एक झलक दाखवत आहे. या टीमसोबत पुन्हा एकदा काम करण्यासाठी मी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही”, अशा आशयाचं कॅप्शन विकीने त्या पोस्टरला दिलं आहे.

उरी : द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटातून आदित्य धार याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. विकीला या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. उरीनंतर विकी आणि आदित्य धार पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 2:53 pm

Web Title: on the 2nd anniversary of uri the surgical strike vicky kaushal released the upcoming movie the immortal ashwatthamas poster dcp 98
Next Stories
1 सतत फोन करून त्रास देणाऱ्या व्यक्तीबद्दल समजताच हंसल मेहता यांनी तक्रार घेतली मागे, कारण..
2 ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत संक्रांतीचा सण होणार साजरा
3 ‘डॉक्टर डॉन’च्या सेटवर शेकोटी, गप्पा आणि बरंच काही…
Just Now!
X