लॉकडाउनमधील सर्वाधिक काळ पनवेलमधल्या फार्महाऊसवर राहिलेला अभिनेता सलमान खान आता चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेटवर पोहोचला आहे. तब्बल साडेसहा महिन्यांनंतर त्याने शूटिंगला सुरुवात केली आहे. आगामी ‘राधे’ या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली असून सलमान यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. सेटवरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत सलमानने शूटिंगचा अनुभव सांगितला.
‘साडेसहा महिन्यांनंतर शूटिंगला सुरुवात केली आहे. बरं वाटतंय’, असं म्हणत सलमानने सेटवरचा फोटो पोस्ट केला. ‘राधे’ या चित्रपटात सलमानसोबतच दिशा पटानी, जॅकी श्रॉफ, रणदीप हुडा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘राधे’ ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. पण करोनाच्या परिस्थितीमुळे चित्रपटाची शूटिंग अपूर्ण राहिली. आता अनलॉकदरम्यान सर्व नियमांचं पालन करत शूटिंगला सुरुवात झाली आहे.
आणखी वाचा : .. म्हणून नेटकरी करतायत ‘द कपिल शर्मा शो’वर बंदीची मागणी
दुसरीकडे सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला ‘बिग बॉस’चा चौदावा सिझन नुकताच सुरू झाला आहे. ३ ऑक्टोबर रोजी या शोचा ग्रँड प्रिमिअर पार पडला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 5, 2020 11:10 am