News Flash

राज कुंद्राने सांगितलं बेडरूम सिक्रेट, शिल्पा झाली शॉक म्हणाली…

पाहा व्हिडीओ

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कपल पैकी एक आहेत. शिल्पा सोशल मीडियार प्रचंड सक्रिय असून ती सतत चाहत्यांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. शिल्पाने राजसोबत काल एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ एका मुलाखतीमधील आहे. या मुलाखतीत त्यांनी त्यांचे बेडरूम सिक्रेट्स सांगितले आहेत.

शिल्पाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत शिल्पा आणि राजने लाल रंगाचे कपडे परिधान केले आहेत. तर व्हिडीओत शिल्पाला कोणत्या प्रकारचे चित्रपट आवडतात असा प्रश्न राजला विचारण्यात आल्याचे दिसत आहे. यावर उत्तर देत राज म्हणतो माहित नाही. हे पाहून शिल्पा आश्चर्यचकित होते. त्यावर राज लगेच म्हणतो की, ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ अशा प्रकारचे चित्रपट शिल्पाला आवडतात. चुकीचे उत्तर ऐकून शिल्पा रागवते. दरम्यान राज लगेच त्याची चूक सुधारत माफ करा हे आमच बेडरूम सिक्रेट आहे. त्यानंतर शिल्पा लगेच हसू लागते.

शिल्पाने हा व्हिडीओ शेअर करत छान असे कॅप्शन दिले आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेत आहे.

या सोबतच शिल्पाने आणखी दोन व्हिडीओ शेअर केले होते. त्यात त्यांनी आणखी काही बेडरूम सिक्रेट्स सांगितले आहेत. त्यातील एका व्हिडीओला, “प्रत्येक प्रेम कहाणी ही वेगळी असते आणि तुमची प्रेम कहाणी ऐकायला मी उत्सुक आहे. फोटो किंवा व्हिडीओद्वारे तुमची लव्हस्टोरी #YourDreamSStory इन्स्टाग्रामवर शेअर करा. सगळ्यात चांगल्या ३ स्टोरीजला आमच्याकडून एक गिफ्ट हॅंपर मिळेल” अशा आशयाचे कॅप्शन शिल्पाने दिले आहे.

शिल्पा आणि राज कुंद्रा हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्स पैकी एक आहेत. शिल्पा आणि राज यांचे लग्न २००९ मध्ये झाले आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 10:52 am

Web Title: on valentines day shilpa shetty is shocked as raj kundra reveled their bedroom secret dcp 98 avb 95
Next Stories
1 अनिताने शेअर केला मुलाचा पहिला फोटो, सोशल मीडियावर व्हायरल
2 ‘चित्रपट प्रदर्शनाचा नियोजनपूर्वक विचार होणे गरजेचे’
3 मुहूर्त घटिका
Just Now!
X