कॉमेडियन सुनील ग्रोव्हर ‘द कपिल शर्मा’ शोमुळे घराघरात पोहोचला. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सुनील सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असल्याचे दिसते. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. त्यात व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने सुनीलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
सुनीलने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत तो छोले कुल्चे बनवताना दिसत आहे. त्याने व्हिडीओ शेअर करत “व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्ताने तुमच्या साथीदाराला छोले कुल्चे नक्की द्या” अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे. व्हॅलेन्टाई डेच्या निमित्ताने सगळे आपल्या साथीदाराला सगळ्यात खास किंवा त्याला आवडत असणारी गोष्ट देतात. तर सुनील आपल्या साथीदाराला छोले कुल्चे देण्याचा सल्ला देत आहे. सुनीलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ १२ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.
View this post on Instagram
सुनील ग्रोव्हरची ‘तांडव’ ही वेब सीरिज काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाली होती. या वेब सीरिजमध्ये सुनीलने, अभिनेता सैफ अली खान, मौहमद जीशान अय्यूब, अभिनेत्री गौहर खान, डिंपल कपाडिया यांच्या सोबत मुख्य भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजमधून सुनील फक्त एक कॉमेडियन नाही तर एक उत्तम अभिनेता असल्याचे दिसून आले आहे. या आधी सुनीलने ‘गब्बर इज बॅक’, ‘भारत’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 15, 2021 12:19 pm