News Flash

मॉडेल अर्पिता तिवारीची हत्याच!

हेतूबाबतचे गूढ कायम; मित्र अमित हजरा गजाआड

अर्पिता तिवारी

सूत्रसंचालक, मॉडेल अर्पिता तिवारीची हत्या झाल्याच्या निष्कर्षांवर आलेल्या मालवणी पोलिसांनी अमितकुमार हजरा याला अटक केली. घटनास्थळावरून गोळा केलेले परिस्थितीजन्य पुरावे आणि मानसशास्त्रीय चाचणीत(पॉलिग्राफिक टेस्ट) अमितने दिलेली विसंगत, संशयास्पद माहिती यावरून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, अर्पिताचा प्रियकर पंकज जाधव याच्यावरील संशय मात्र कायम असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

वाचा : ‘वयाच्या २० व्या वर्षापासूनच मासिक पाळीविषयी माहिती होती’

११ डिसेंबरला मालवणीच्या मानवस्थळ या बहुमजली इमारतीच्या १५ व्या माळ्यावरून पडून मृत्यू घडला. सुरुवातीला अर्पिताने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला. मात्र तिवारी कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्याने मालवणी पोलिसांनी तपास पुढे सुरू ठेवला. अर्पिता, जाधव यांची अमितशी एका बारमध्ये ओळख झाली आणि नंतर तिघे मित्र बनले. जाधव मालवणीतल्या मानवस्थळ इमारतीच्या १५व्या मजल्यावर भाडय़ाने राहात होता. तेथे अर्पिताची ये-जा होतीच पण हळू हळू अमितचाही वावर वाढला. जाधवसोबत खटके उडत होते त्याच वेळी अर्पिता आणि अमित यांच्यात जवळीक निर्माण होत होती. समाजमाध्यमांच्या झाडाझडतीतून ही बाब पोलिसांच्या लक्षात आली. ११ डिसेंबरच्या पहाटे याच मुद्दय़ावरून तिघांमध्ये शाब्दिक खटके उडाल्याची माहितीही पोलिसांना मिळाली.

वाचा : ‘फू बाई फू’ फेम विकास समुद्रे ब्रेन हॅमरेजमुळे रुग्णालयात दाखल

अर्पिताला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न अमितने सुरू केला होता. त्यातूनच तिची हत्याही घडल्याचा संशय आहे. हत्येमागील हेतू जाणून घेण्यासाठी अमितकडे चौकशी केली जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले. सोमवारी अमितला दंडाधिकारी न्यायालयाने २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत धाडले.

तपासासाठी बाहुल्यांचा वापर
अर्पिता पडली की तिला ढकलले हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तिच्याच उंची-वजनाच्या बाहुल्या तयार केल्या. एक बाहुली स्वत:हून खाली पडेल, अशी व्यवस्था केली गेली. तर दुसरी पोलिसांनी स्वत: खाली ढकलली. यापैकी ढकललेली बाहुली अर्पिताचा मृतदेह जिथे, ज्या अवस्थेत सापडली तिथेच, तशीच पडली. यावरून तिवारी कुटुंबाने व्यक्त केलेल्या संशयात तथ्य आहे, हे स्पष्ट झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 3:04 pm

Web Title: one arrested in murder case of anchor arpita tiwari
Next Stories
1 आलिया भट्ट, रणवीर सिंगच्या ‘गली बॉय’ सिनेमाचे फोटो लीक
2 ड्रेसवर हजारो डॉलर्स खर्च करण्यापेक्षा वडिलांना मदत कर, मेगनच्या बहिणीने लगावला टोला
3 Breathe trailer : आर. माधवनच्या ‘ब्रीद’ या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित
Just Now!
X