04 March 2021

News Flash

कोकेन घेणाऱ्या अभिनेत्रीवर आली तोंडघशी पडण्याची वेळ; शेखर सुमनचा कंगनाला उपरोधिक टोला?

अध्ययन सुमनसोबत कंगनाचे कधी एकेकाळी प्रेमसंबंध होते.

कंगना रणौत, शेखर सुमन

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या पीरियड ड्रामा असणाऱ्या एका चित्रपटाद्वारे कंगना रणौत प्रेक्षकांच्या भेटीला आली. रंगून या चित्रपटामध्ये कंगनाने ज्युलिया या थरारदृश्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तत्कालीन प्रसिद्ध अभिनेत्रीची व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटाला समीक्षकांनीही संमिश्र प्रतिक्रिया दिल्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये आणण्यासाठी रंगून सपशेल अयशस्वी ठरला आहे असेच म्हणावे लागेल. कंगनाच्या या चित्रपटाला मिळालेल्या अपयशाबद्दल सध्या सोशल मीडियावरही विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. याच चर्चांमध्ये अभिनेता शेखर सुमनचे ट्विट कंगनाला चर्चेत आणण्यामागचे आणखी एक कारण ठरत आहे.

शेखर सुमनच्या मुलासोबत म्हणजेच अध्ययन सुमनसोबत कंगनाचे कधी एकेकाळी प्रेमसंबंध होते. पण, त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि दुराव्याची बरीच कारणेही सर्वांसमोर उघड झाली. कंगनाच्या रंगून चित्रपटाला मिळालेल्या अपयशाला लक्ष करत शेखर सुमन यांनी उपरोधिकपणे त्यांच्या ट्विटर अकाऊंटद्वारे एका ट्विटच्या माध्यमातून म्हटलेय की, ‘कोकेन घेणाऱ्या एका अभिनेत्रीवर तिच्याकडे नसलेल्या प्रसिद्धीचे ओझे होते. आता याच अभिनेत्रीवर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. यातूनच ओळखा, ती अभिनेत्री कोण असेल?’.

शेखर सुमन यांच्या या दुहेरी अर्थ असणाऱ्या ट्विटमध्ये त्यांनी कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नसताना सोशल मीडियाद्वारे नेटिझन्सनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात करत सुमन यांच्या ट्विटचा संदर्भ कंगनाच्या नावाशी जोडण्यास सुरुवात केली. कंगनाच्या ‘रंगून’ या चित्रटपटाच्या वाट्याला आलेल्या अपयशामुळे सध्या सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच अध्ययन सुमन सोबत कंगनाचे नाते फारसे चांगले नसल्यामुळे आता त्यावरुनही एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

shekhar1-tweet_022817115901-1

shekhar2-tweet_022817115901-1

shekhar2-tweet_022817115901 shekhar3-tweet_022817115901 shekhar4-tweet_022817115901

दरम्यान, अभिनेता ह्रतिक रोशनविरुद्धच्या वादामुळे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या कंगना रणौतचे नाव पुन्हा एकदा शेखर सुमनच्या ट्विटमुळे चर्चेत आले आहे. कंगनाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर अध्ययन सुमन याने काही दिवसांपूर्वी कंगनासंदर्भात धक्कादायक खुलासे करून एकच खळबळ उडवून दिली होती. मीदेखील ह्रतिक ज्या परिस्थितीतून जात आहे त्यातून आपणही गेल्याचे त्याने म्हटले होते. अध्ययन सुमनसोबत काही काळ कंगनाचे अफेअर होते. ‘कंगना मला मारहाण करायची, माझ्यावर काळी जादू करायची’, असे तो म्हणाला होता. ‘राज २ ‘या चित्रपटात अध्ययन आणि कंगना यांनी एकत्र काम केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 1:24 pm

Web Title: one cocained actress has fallen flat on her face does shekhar suman slams kangna ranaut on rangoon failure
Next Stories
1 करणच्या शोमध्ये कपिलची विनोदी फटकेबाजी
2 VIDEO: ऑस्करच्या मंचामागे प्रियांकाने मारले टकिला शॉट्स
3 Oscars 2017: देव पटेलची ‘मेरे पास माँ है’ मोमेंट
Just Now!
X