03 March 2021

News Flash

‘एक कलाकार, एक संध्याकाळ’मध्ये आज मुलुंडमध्ये जयंत सावरकर

ज्येष्ठ रंगकर्मी आणि मालिका-चित्रपट अभिनेते जयंत सावरकर यांना प्रेक्षक अलीकडे मालिका-चित्रपटांतून छोटय़ा छोटय़ा भूमिकांमधून पाहत आले आहेत.

| August 14, 2015 03:58 am

आठवडय़ातील विरंगुळा
ज्येष्ठ रंगकर्मी आणि मालिका-चित्रपट अभिनेते जयंत सावरकर यांना प्रेक्षक अलीकडे मालिका-चित्रपटांतून छोटय़ा छोटय़ा भूमिकांमधून पाहत आले आहेत. त्यांची रंगभूमीवरील कारकीर्द, त्यांची गाजलेली नाटके, तसेच त्यांच्या आयुष्यात त्यांना भेटलेली माणसे, त्यांचे वैयक्तिक आयुष्य या विषयी मात्र लोकांना फारशी माहिती नसते. म्हणूनच महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड या संस्थेने ‘एक कलाकार एक संध्याकाळ’ या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता केले आहे. डॉ. मा. गो. खांडेकर स्मृतिप्रीत्यर्थ ‘एक कलाकार एक संध्याकाळ’ या कार्यक्रमात जयंत सावरकर यांना पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. त्यावेळी सावरकर यांचा जीवनपट उलगडण्याबरोबरच ते स्वत: त्यांची गाजलेली स्वगते तसेच नाटय़प्रवेश सादर करणार आहेत.या कार्यक्रमासोबतच संस्थेचे माजी विश्वस्त, लेखक वसंतराव ऊर्फ दादा केतकर लिखित ‘गीत कृष्णायन’ हा भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावरील गीतसंग्रहाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे यांच्या हस्ते केले जाणार आहे. संस्थेच्या मुलुंड पश्चिम येथील वास्तूतील सु. ल. गद्रे सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्व रसिकांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 3:58 am

Web Title: one evening one actor
Next Stories
1 ‘शोले’ने विधवा पुनर्विवाहाचा संदेश दिला- अमिताभ बच्चन
2 ‘शोले’ची चाळीशी: चित्रपटाच्या काही खास गोष्टी
3 व्हिडिओ : खऱ्याखुऱ्या माणसांच्या स्वप्नांचा ‘डबल सीट’ प्रवास
Just Now!
X