“भारतात असलेली अयोध्या ही बनावट आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी होते” असं खळबळजनक वक्तव्य नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी केलं आहे. भारताने सांस्कृतिक आक्रमण करुन बनावट अयोध्या निर्माण केली असंही ते म्हणाले. त्यांच्या वक्तव्यावर बॉलिवूड दिग्दर्शक ओनिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आता प्रभू रामचंद्रांच्याही नागरिकतेवरुन वाद घाला”, असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

अवश्य वाचा – आणखी एका कलाकाराची आत्महत्या; २७ व्या वर्षी गोळी घालून संपवलं आयुष्य

chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
good touch bad touch
मुलेही ‘गुडटच-बॅडटच’चे शिकार! सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख म्हणतात, घराचा वंश पुढे चालवू शकत नसल्याने…

“पुढच्या वेळी ही मंडळी म्हणतील वाल्मिकी देखील नेपाळी होते. कधीही वाटलं नव्हतं प्रभू राम यांच्या नागरिकतेबाबत आपण वाद घालू” अशा आशयाचे ट्विट करुन ओनिर यांनी आपला राग व्यक्त केला आहे. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तसेच काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अवश्य वाचा – टाळ्या-थाळ्या झाल्या, आता डीजे वाजवायचा का?; बॉलिवूड गायकाचा केंद्राला सवाल

हे प्रकरण नेमकं आहे काय?

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली हे गेल्या काही काळात सातत्याने भारतावर निशाणा साधत आहेत. सोमवारी ओली यांनी सांस्कृतिक अतिक्रमणासाठी भारताने बनावट अयोध्या निर्माण केल्याचा दावा केला आहे. अयोध्या भारतात नसून नेपाळमध्ये आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी असल्याचंही त्यांनी म्हटं आहे. कवी भानुभक्त आचार्य यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही तर नेपाळवर सांस्कृतिकदृष्ट्या अत्याचार केला गेल्याचंही म्हटलं आहे. याआधी करोना संसर्गावरुनही त्यांनी भारतावर टीका केली होती. भारतातून येणार करोनाचं संक्रमण हे चीन आणि इटलीतून येणाऱ्या संक्रमणापेक्षा जास्त घातक आहे असं त्यांनी म्हटलं होतं.